विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा समाजाला न्याय देण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केले. महाराष्ट्रात मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही. शरद पवार एकदा दोनदा नव्हे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. परंतु त्यांनी मराठा समाजाची मातीच केली, असा हल्लाबोल रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केला.Sadabhau Khot’s attack – Sharad Pawar destroyed the Maratha society; But justice was given by Fadnavis
विधान परिषदेच्या आमदारकीची आज शपथ घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. पुढे बोलताना सदाभाऊ म्हणाले की, शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री झाले. मराठ्यांचे नेते म्हणून मिरवले. पण मराठा समाजाची त्यांनी मातीच करण्याचे काम केले. दोनदा मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम एकदा देवेंद्र फडणवीस यांनी केलं. दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मराठा समाजासाठी अनेक योजना
मराठा समाजासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ असेल, सारथी सारखी संस्था असेल त्या माध्यमातून 20 विद्यार्थी युपीएसीमध्ये आले. अशा अनेक योजना मराठा समाजासाठी फडणवीस यांनी केल्या आहेत. त्यामुळं आरक्षणाच्या मुद्यावर राजकीय दृष्टीकोणातून न पाहता, राज्यातील ओबीसी आणि मराठा समाज गुणा गोविद्यांना राहिला पाहिजे असे खोत म्हणाले.
जरांगेंसोबत सरकार चर्चा करायला तयार
मनोज जरांगे पाटील यांना माझी विनंती आहे की, सरकार चर्चेसाठी तयार आहे. कायदे तज्ज्ञांना सोबत घेऊन एक चांगला मार्ग काढू असे सदाभाऊ खोत म्हणाले. हा मार्ग महाराष्ट्राच्या हिताचा असेल. कोणतही आंदोलन चालवत असताना सरकार आपल्याशी बोलत नसेल तर आंदोलन आक्रमक करायचे असते, सरकार आपल्याशी बोलत असेल तर संवाद आणि चर्चा करावी, यातून मार्ग निघेल असा विश्वास देखील खोत यांनी व्यक्त केला.
शेतातून थेट विधानभवनाच्या बांधावर
शेतीच्या बांधावरून मला विधानभवनाच्या बांधावर उभं केलं आहे. मी भाजपसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. मी सर्व शेतकऱ्यांना न्याय देणार आहे. माझ्या या पदाचा उपयोग हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य गोरगरीब जनता, कष्टकरी वर्ग आणि माझ्या बळीराजाच्या उन्नतीसाठी करेन, असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App