विशेष प्रतिनिधी
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतील बार मालकांकडून निलंबित सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे याने केलेली ४.७० कोटी रुपयांची वसुली ही नंबर वन म्हणजे अनिल देशमुख यांच्यासाठीच होती, असा जबाब त्याने दिला आहे.Sachin Waze’s number one is Anil Deshmukh , one who has collected Rs 4.70 crore for him
नंबर वन म्हणजे तत्कालिन पोलीस आयुक्त परमबीर सिंग असल्याचे भासविण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून चालू होता.सांगितले आहे. नंबर वन म्हणजे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग नसून गृहमंत्री अनिल देशमुख यांना उद्देशून म्हटल्याचे त्याने म्हटले आहे.
देशमुख यांचे पीए संजीव पालांडे व कुंदन शिंदे यांनी जमा केलेले ४.७० कोटी देशमुख यांच्यासाठी होते असेही आता स्पेट झाले आहे.सचिन वाझे गेल्या ४ महिन्यांपासून एनआयएच्या ताब्यात आहे. न्यायालयाने दिलेल्या परवानगीनंतर ईडीने १० ते १२ जुलै या दरम्यान तळोजा कारागृहात जाऊन चौकशी केली आहे.
मुंबईतून बार मालकाकडून गेल्या डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत ४.७० कोटी वसूल केले होते. त्यासाठी तो ही रक्कम नंबर वनसाठी असल्याचे त्यांना सांगत होता, असा जबाब बार चालकांनी दिला आहे. नंबर वन म्हणजे नेमके कोण आयुक्त की गृहमंत्री, याबद्दल त्यांच्यात संदिग्धता होती
. त्यामुळे अधिकाºयांनी वाझेकडे चौकशी केली. यावेळी त्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाच नंबर वन म्हणत असल्याची कबुली दिली आहे. या तपासाची माहिती न्यायालयाकडे दिली जाणार आहे.माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध दाखल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासांतर्गत ईडी त्यांच्या व कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या नावे असलेल्या मालमत्ता व आर्थिक व्यवहाराची पडताळणी करीत आहे.
त्यांचे पुत्र सलील देशमुख यांनी नवी मुंबईतील उरण तालुक्यातील धुतुम गावात ८.३ एकर भूखंड खरेदी केला आहे. पळसपे फाटा ते जेएनपीटी या महामार्गावरील जागेची किंमत ३०० कोटी असून तो २००६ ते २०१५ या कालावधीत विविध टप्प्यात ग्रामस्थांकडून खरेदी करण्यात आला आहे. प्रीमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावे हा व्यवहार झाला
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App