मनसुख हिरेन यांचा मृतदेह जेथे सापडला, त्या रेती बंदर स्पॉटवर एनआयएने सचिन वाझेला नेले

वृत्तसंस्था

मुंबई – जी मनसुख हिरेन हत्या केस यशस्वीरित्या सोडविल्याचा दावा महाराष्ट्र एटीएसने केला होता, त्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएकडे येताच त्याच्या टीमने अत्यंत वेगाने तपास कामाला सुरूवात केली आहे. NIA takes Sachin Waze to the spot where Mansukh Hiren’s body was found in Retibandar, Thane; as part of an investigation into Hiren’s deathमनसुख हिरेन यांचा मृतदेह ज्या ठिकाणी आढळला, त्या रेती बंदर स्पॉटवर एनआयएच्या टीमने सचिन वाझेला आज सायंकाळी नेले आणि घटनाक्रम तसेच नेमकी ठिकाणेही तपासाच्या दृष्टीने समजावून घेतली. आधी महाराष्ट्र एटीएसच्या टीमने रेतीबंदर स्पॉटवर तपास केला आहे. तसे त्यांनी कोर्टातही सांगितले होते. त्याचबरोबर सचिन वाझे हाच खुनी असल्याचा दावाही एटीएसने कोर्टात केला होता.

पण आता सचिन वाझेचा ताबा एनआयएच्या टीमकडे आल्यानंतर या टीमने एकूणच प्रकरणाचा मूळापर्यंत छ़डा लावण्यासाठी सचिन वाझेला रेती बंदरच्या स्पॉटवर आणले होते.

रेती बंदरावरच मनसुख हिरेन यांचा मृतदेह पोलीसांना आढळला होता. संशयास्पद मृत्यू म्हणून ठाण्यातील पोलीस स्टेशनमध्ये त्याची नोंदही करण्यात आली आहे. पण नंतर एकूणच या प्रकरणाच्या तारा वेगळ्याच दिशेने गेल्या. अँटिलिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या तारा सध्या सचिन वाझेपर्यंत जुळून आल्या आहेत. यापुढेही त्या तारा नेमक्या कोणापर्यंत जातात याचा तपास एनआयए करणार आहे.

सचिन वाझेला रेती बंदरच्या स्पॉटवर आणणे ही त्या तपासाची पहिली पायरी आहे.

NIA takes Sachin Waze to the spot where Mansukh Hiren’s body was found in Retibandar, Thane; as part of an investigation into Hiren’s death

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*