विशेष प्रतिनिधी
मुंबई – सचिन वाझेंच्या लेटरबाँम्बमध्ये केवळ अनिल देशमुख आणि अनिल परब या दोन मंत्र्यांचीच नावे नसून दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांचेही नाव आले आहे. sachin vaze letter bomb; darshan ghodawat and Dy CM ajit pawar figures in sachin vaze`s letter regarding gutkha scam
सचिन वाझेंनी एनआयए ला लिहिलेल्या पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार – दर्शन घोडावत आणि बेकायदा गुटखा उत्पादक – वितरक आणि विक्रेते यांच्याकडून १०० कोटींची वसूली करण्याबाबत दावे केले आहेत.
या पत्रात सचिन वाझे म्हणतात, की नोव्हेंबर २०२० मध्ये दर्शन घोडावत नामक एक व्यक्ती मला भेटली. त्यांनी आपली स्वतःची ओळख उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्ती अशी करून दिली. बेकायदा गुटखा उत्पादक – वितरक आणि विक्रेते यांची एक यादी त्यांनी माझ्याकडे दिली आणि या सगळ्यांकडून १०० कोटींची वसूली करण्यास मला सांगितले. मी हे कृत्य करण्यास नकार दिला.
त्यानंतर मी मुंबई परिक्षेत्रातील बेकायदा गुटखा वितरक आणि विक्रेत्यांवर कारवाई करण्यास सुरूवात केली. त्यावेळी पुन्हा एकदा दर्शन घोडावत हे मला माझ्या कार्यालयात येऊन भेटले. त्यांनी या कारवाईबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याचे मला सांगितले तसेच त्यावेळी देखील मला त्या बेकायदा गुटखा वितरक आणि विक्रेत्यांकडून पैसे घेण्यास सांगितले. मी त्या वेळी देखील नकार दिला, असा दावाही सचिन वाझे यांनी एनआयए ला लिहिलेल्या पत्रात केला आहे.
याचा अर्थ… सचिन वाझेंनी पत्रात फक्त अनिल देशमुख आणि अनिल परब यांची नावे घेतल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या आहेत. प्रत्यक्षात तसे नसून सचिन वाझेंच्या पत्रात अजित पवारांचेही नाव तितकेच ठळकपणे घेतले आहे.
तर बातम्या वाचा…
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App