ऑक्सिजनसाठी ‘Mission Oxygen’ ही मोहीम सुरू झाली आहे आणि त्याच्या माध्यमातून देशांतील अनेक हॉस्पिटल्सना देणगी व ऑक्सिजन सिलेंडर दान केले जाणार आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई: करोना संकटाचा सामना करत असताना सध्या देशात ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर करोनाविरोधातील लढ्यात मैदानात उतरला आहे. सचिनने मिशन ऑक्सिजनसाठी तब्बल एक कोटी रुपयांची मदत केली आहे. Sachin Tendulkar donates Rs 1 crore to procure oxygen concentrators for COVID patients
भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि मागील ७-८ दिवसांपासून दररोज साडेतीन लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही कोलमडलेली पाहायला मिळत आहे. ऑक्सिजन मिळत नसल्यानं लोकांचा तडफडून मृत्यू होत आहे… हॉस्पिटल्समध्ये बेड्स मिळत नाहीत… त्यामुळे एकूणच देशात गंभीर वातावरण आहे. अशात अनेक दिग्गज मंडळींनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
सचिन तेंडूलकरने मिशन ऑक्सिजन या मोहिमेसाठी 1 कोटी रुपयांची मदत केली आहे. 250 उद्योजक तरूणांनी सुरू केलेल्या या मोहिमेत सचिनने सहभाग घेतला आहे. यापूर्वी गेल्या वर्षीही सचिनने अशीच मदत केली होती. तेव्हा त्याने पंतप्रधान सहाय्यता निधी आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी 25 लाख रुपयांचा निधी दिला होता. मिशन ऑक्सिजन मोहिमेसाठी एक कोटी रुपयांची मदत करत असल्याची माहिती सचिनने ट्विटरद्वारे दिली.
🙏🏻 pic.twitter.com/rFEDOCFOkP — Sachin Tendulkar (@sachin_rt) April 29, 2021
🙏🏻 pic.twitter.com/rFEDOCFOkP
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 29, 2021
सचिनप्रमाणेच अन्य क्रिकेटपटूंनीही मदतीचा हात पुढे केला आहे. काही दिवसांपूर्वीच कोलकाता नाईट रायडर्सचा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने भारतातील ऑक्सिजनच्या पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी ५० हजार डॉलर म्हणजेच ३७ लाख ३६ हजार रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिले होते. तसेच ब्रेट लीने भारतात ऑक्सिजन पुरवठ्यासाठी क्रिप्टो रिलीफला एक बिटकॉइन म्हणजेच सुमारे ४२ लाख रुपयांची देणगी दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App