माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेला खंडणीच्या गुन्ह्यात अटक

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे : खंडणी, धमकाविणे, बेकायदा सावकारी आणि आर्थिक फसवणूक अशा गुन्ह्यांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे.RTI activist Ravindra Barhate arrested for ransom

बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांच्याकडे खंडणी मागून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात ही कारवार्इ करण्यात आली आहे. या प्रकरणात आठ आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे.



गुन्ह्यातील अटक महिला आरोपीने फिर्यादी यांच्याशी मैत्रीपूर्वक संबंधाचा फायदा घेऊन बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन आरोपींनी संगनमत करून फिर्यादींकडून बावधन येथील फ्लॅट नावावर करून घेतला. तसेच ६ लाख रुपयांपैकी एक लाख ५० हजार रुपये खंडणी घेतली.

तसेच फिर्यादींना धमकी देऊन त्यांच्या भागीदाराला देखील बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी बराटे याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. फिर्यादींकडून खंडणी उकळण्याचा कट त्यांनी कोठे रचला?,

गुन्ह्यातील सहभागा बाबत भूमिका जाणून घेण्यासाठी, बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी खंडणी घेतल्या बाबतचा पुरावा जप्त करण्यात आला असून, त्याबाबत त्याच्याकडे तपास करण्यासाठी, त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी न्यायालयात केली. न्यायालयाने बऱ्हाटे ३० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला आहे.

RTI activist Ravindra Barhate arrested for ransom

महत्त्वाच्या बातम्या
Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात