RT-PCR : आरटीपीसीआर टेस्टसाठी आता ३५० रुपये आकारणार ; इतर चाचण्यांचे दरही निश्चित..

विशेष प्रतिनिधी

मुंबई:राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी करण्यात आले आहेत. राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला .RT-PCR: Rs 350 will now be charged for RTPCR test; Other test rates are also fixed.

आत्तापर्यंत किमान सहा वेळा या दरांमध्ये सुधारणा करण्यात आली आता सुधारित दरांनुसार कोरोनाची चाचणी ३५० रूपयांमध्ये होणार आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली .



कोरोनाचं निदान करण्यासाठी आवश्यक असणारी RT-PCR चाचणीसाठी 350 रुपये आकारण्यात येणार

  • आरोग्य विभागाकडून निर्णय जाहीर, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
  • आता केवळ 350 रुपयांत चाचणी करणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक – आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
  •  शासन निर्णयानुसार, आता कोरोना चाचण्यांसाठी ३५०, ५०० आणि ७०० रुपये दर निश्चित
  • संकलन केंद्रावरुन नमूना घेवून त्याची वाहतूक, अहवाल देणे या सर्वांसाठी रुग्णाकडून ३५० रुपये आकारले जातील
  • रुग्णालय, कोविड केअर सेंटर, कॉरंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळांमध्ये तपासणी, अहवाल यासाठी ५०० रुपये
  • तर रुग्णाच्या निवासस्थानावरुन नमूना घेवून त्याचा अहवाल देणे यासाठी ७०० रुपये आकारण्यात येणार
  • राज्यात कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही
  • आरटीपीसीआर चाचणीसोबतच रॅपीड अँटीजेन, अँटीबॉडीज या चाचण्यांसाठी दर निश्चित करण्यात आले आहे.

हे दर अनुक्रमे रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत आल्यास, तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित नमुने घेतल्यास आणि रुग्णाच्या घरी जाऊन नमुने घेतल्यास अशा तीन टप्प्यांसाठी आकारण्यात येणार आहेत. अँटीबॉडीज (एलिसा फॉर सार्स कोविड) या चाचण्यांसाठी २००,२५० आणि ३५० असे दर निश्चित करण्यात आले आहेत

सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटीबॉडीज या चाचणीसाठी ३००,४०० ५००असे दर निश्चित करण्यात आले आहेत.रॅपीड अँटीजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास १०० १५० आणि २५० दर आता निश्चित करण्यात आले आहेत.

RT-PCR: Rs 350 will now be charged for RTPCR test; Other test rates are also fixed.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात