प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती संस्कार, शिक्षण, आरोग्य, कृषी, पर्यावरण, स्वावलंबन, आपत्ती विमोचन आणि पूर्वांचल विकास या आयामांमध्ये मागील ४९ वर्षांपासून महाराष्ट्रात सेवाकार्य करीत आहे. याअंतर्गत समितीने ९ जानेवारी २०२२ रोजी एका नव्या सेवा प्रकल्पाची घोषणा केली आहे.RSS Jankalyan Samiti announced new program
‘आजची लहान मुले उद्याचे जबाबदार तरुण आणि आपल्या देशाचे सशक्त भविष्य आहेत’ या मुलांसमवेतच त्यांच्या मातांचे आरोग्य सक्षम असेल तर संपूर्ण कुटुंब सुदृढ राहील.’ यानुसार समितीने ‘वस्ती परिवर्तन योजने’ अंतर्गत या वस्त्यांमध्ये ‘माता, बालक, आरोग्य आणि आहार प्रकल्प’ योजनेस प्रारंभ करण्यात आल्याची घोषणा केली आहे.
जनकल्याण समितीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले कि, मुंबईत ४६ सेवावस्त्यांमध्ये सर्वेक्षण करून त्यानंतर प्रत्येक वस्तीतील ५० गर्भवती महिला, ० ते ६ वर्षांपर्यंतची बालके आणि त्यांच्या माता अशाप्रकारे ४६ वस्त्यांमधील एकूण २३५० जणांना दररोज पोषक आहार प्रदान करण्यात येईल, याचबरोबर आरोग्य तपासणी आणि उपचारही करण्यात येणार आहेत.
या प्रकल्पाअंतर्गत सध्या ४६ वस्त्यांमध्ये ४६ महिला कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली. या महिला कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी पोषक आहारात निरनिराळ्या प्रकारची चिक्की देण्यास प्रारंभ करण्यात आला.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबईतील लायन्स म्युनिसिपल स्पोर्ट्स काम्प्लेक्स, सांताक्रूझ येथे सामाजिक अंतर राखून तसेच कोरोना नियमांचे पालन करून अत्यंत छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमात लायन्स क्लब स्पोर्टिंग लायन्स आरोग्य तपासणीसाठी मोबाइल डिस्पेंसरी वॅनचे उद्घाटन अजय बाली आणि राजेश अजगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले. एजेस फेडरल लाइफ इंश्योरेंस कंपनी लिमिटेडच्या वतीने या वाहनाकरिता निधी उपलब्ध करून देण्यात आला.
रा. स्व. संघ जनकल्याण समिती, मुंबई महानगराचे अध्यक्ष संदीप वेलिंग यांनी सांगितले कि, या सेवा कार्यात सगळ्यांचा हातभार आवश्यक आहे. लवकरच मोबाइल डिस्पेंसरी वॅनकरिता दोन डॉक्टर्सची नियुक्ती करण्यात येईल त्यानंतर लगेचच हे वाहन वस्तिवस्तींमध्ये जाऊन सेवाकार्यास प्रारंभ होईल. वस्त्यांमध्ये जनकल्याण समितीच्या भविष्यातील योजनांवर चर्चा करतेवेळी वेलिंग यांनी नमूद केले कि, या वस्त्यांमध्ये सेवेकऱ्यांच्या संख्या वाढविणे,
आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून वस्त्यांमध्ये आरोग्य समस्यांची तपासणी आणि काउंसलिंग करणे, मुलांकरिता संस्कार वर्ग, किशोरी विकास वर्ग, अभ्यास वर्ग इ. निरनिराळे उपक्रम राबविण्यात येण्याच्या योजना करण्यात येत आहेत. या योजनाविषयक अधिक माहिती घेण्यासाठी या योजनांचे आयाम प्रमुख संजय मालकर (९२२ ०८२ २३३४) यांच्याशी संपर्क साधावा.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App