छत्रपती शिवाजी महाराजही ओबीसी होते, माझे ३०-३५ आमदार आले की, मराठ्यांसह मुस्लिमांनाही आरक्षण देतो, जानकरांचा दावा

माझे 30-35 आमदार होऊ द्या, मराठासह मुस्लीम समाजालाही आरक्षण देतो, असा दावा रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले आहे. परभणीच्या गंगाखेडमध्ये ओबीसी समाजाने आरक्षणासाठी आंदोलन सुरू केले आहे. गंगाखेड येथे जाऊन महादेव जानकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी हे वक्तव्य केले. मराठा समाजाला सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिल्याचंही ते म्हणाले.RSP Leader Mahadev Jankar Said, IF I have 30 to 35 MLA i Will Give Reservation To OBC Maratha And Muslims


प्रतिनिधी

परभणी : माझे 30-35 आमदार होऊ द्या, मराठासह मुस्लीम समाजालाही आरक्षण देतो, असा दावा रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले आहे. परभणीच्या गंगाखेडमध्ये ओबीसी समाजाने आरक्षणासाठी आंदोलन सुरू केले आहे. गंगाखेड येथे जाऊन महादेव जानकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी हे वक्तव्य केले. मराठा समाजाला सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिल्याचंही ते म्हणाले.

जानकर म्हणाले की, आम्ही सर्वसामान्यांना न्याय देण्याचे प्रयत्न करतो. माझे 30-35 आमदार होऊ द्या. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अवघ्या दहा मिनिटांतच मार्गी लावतो. मराठा आणि मुस्लिमांनाही आरक्षण देतो, असा दावाही त्यांनी केला.



ते म्हणाले की, मुस्लिमांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय. गॅरेजमध्ये मुस्लिम, अंड्याच्या दुकानात मुस्लिम, चिकन विक्रीला मुस्लिम त्यांचा कुठे कलेक्टर नाही. या राज्यात हिंदू-मुस्लिम दोन्ही भिकारी आहेत आणि राज्य चालवणारा तिसराच मालक आहे. हे सर्वांना लक्षात घ्यायला पाहिजे. मी मराठा समाजाला विनंती करतो की, शाहू महाराजांनी देशात पहिले आरक्षण दिले ते मराठा समाजाचे होते. त्यानंतर मराठ्यांचे आरक्षण का गेले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजही ओबीसी होते. ते कुळवाडीभूषण राजा होते. त्यावेळी मराठ्यांना वाटले की, आम्ही सर्वत्र मिरवतो, आम्हाला नको ते आरक्षण आणि काय अवस्था झाली बघा, असेही ते म्हणाले.

RSP Leader Mahadev Jankar Said, IF I have 30 to 35 MLA i Will Give Reservation To OBC Maratha And Muslims

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात