नाशिकच्या जिंदाल कंपनीतील आगीतील मृतांच्या नातलगांना 5 लाख रुपयांची मदत; जखमींवर सरकारी खर्चातून उपचार

प्रतिनिधी

नाशिक : नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील जिंदाल पॉलीफिल्म प्रा. लिमिटेड या कारखान्यातील पॉलीफायर या प्लांटला ११ ते सव्वा अकरा वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. आगीत दोन कामगारांचा मृत्यू झाला असून 17 जणांना बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, तसेच घटनेतील मृतांना 5 लाखांची मदत देण्यात येईल. आगीतील जखमींवर सरकारी खर्चातून उपचार करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाला भेट दिल्यावर केली. Rs 5 lakh assistance to relatives of those killed in Jindal Company fire, Nashik

आग वाढत आहे 

ही आग पुढे पाच हजार लीटर क्षमता असलेल्या केमिकलयुक्त दोन्ही टाक्यांना लागली. त्यामुळे आगीने अजुनच जास्त भड़का घेतला. या दोन्ही टाक्या जळून खाक झाल्यामुळे  मोठ मोठे स्फोट होऊन सुमारे दहा किमी पर्यंत गावांमध्ये जोरदार हादरे बसून भीतीयुक्त वातावरण तयार झाले होते. विशेष म्हणजे ज्या दोन केमिकल युक्त टाक्या जळून खाक झाल्या, त्यांच्या शेजारीच हजारों टन स्क्रैप मटेरियलने पेट घेवुन आग वाढत आहे, तर तिथेच सुमारे अठरा हजार लीटर क्षमतेची केमिकल भरलेली एक मोठी टाकी असून आग त्या टाकीपर्यंत जात आहे.

जर या टाकीने पेट घेऊन भड़का झालाच तर कारखान्यातील एक पेट्रोल पंप आणि इतर सर्वच ठिकाणी आग लागण्याची चिन्हे दिसत आहे.  केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी डी. गंगाधरण, तहसीलदार परमेश्वर कासुळे यांचेसह जिल्हाभरातील मुख्य पोलिस यंत्रणा व त्यांचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले.

 

Rs 5 lakh assistance to relatives of those killed in Jindal Company fire, NashikRs 5 lakh assistance to relatives of those killed in Jindal Company fire, Nashik

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात