
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आजोबांच्या पावसात भिजण्याची नातवाने केली कॉपी पण पुतण्याच्या भिजण्यावर चुलत्याने फेरले पाणी!!, असे आज महाराष्ट्र विधिमंडळ परिसरात घडले.Rohit pawar tried to imitate sharad pawar by wetting in rain, but ajit pawar exposed him
शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज विधिमंडळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायऱ्यांवर भिजले. पण चुलते अजित पवार यांनी त्यांच्या भिजण्यावर पाणी फेरले.
आमदार रोहित पवारांनी त्यांच्या कर्जत जामखेड मतदार संघात एमआयडीसी करण्याच्या मागणीसाठी विधिमंडळ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. त्यांनी भर पावसात तिथे उपोषण आरंभले होते. रोहित पवार पावसात भिजून उपोषण करत असल्याचे फोटो व्हायरल झाले. त्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भेटून ताबडतोब बैठक लावून कर्जत जामखेडच्या एमआयडीसीचा विषय क्लियर करण्याचे आश्वासन दिले आणि रोहित पवारांनी उपोषण संपविले.
पण दरम्यानच्या काळात रोहित पवार पावसात भिजल्याचे फोटो व्हायरल झाले. आमदार अनिल देशमुख यांनी हा विषय विधानसभेत उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना अजित पवारांनी त्याविषयी विधानसभेत स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली. अजित पवारांनी सभागृहात वस्तुस्थितीच मांडली.
अजित पवारांनी दाखविले पत्र
मूळात संबंधित लोकप्रतिनिधींनी उद्योग मंत्र्यांच्या आधीच्याच आश्वासनानंतर पावसात भिजून उपोषण करायला नको होते. उदय सामंत यांनी संबंधित लोकप्रतिनिधीला म्हणजे रोहित पवारांना 1 जुलै 2023 रोजी पत्र दिले होते आणि त्यात विधिमंडळ अधिवेशनादरम्यान कर्जत जामखेड एमआयडीसी संदर्भात बैठक घेऊन अधिसूचना काढण्याचे आश्वासन दिले होते. विधिमंडळ अधिवेशन सुरू होऊन एक आठवडा झाला आहे. अजूनही ते सुरू आहे. पण लोकप्रतिनिधींनी म्हणजे रोहित पवारांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असे सांगून अजित पवारांनी उदय सामतांनी रोहित पवारांना लिहिलेले पत्रच विधानसभेत दाखविले. त्यामुळे रोहित पवारांचा पावसात भिजून उपोषण करण्याचा सगळा बनाव उघडा पडला!!
Rohit pawar tried to imitate sharad pawar by wetting in rain, but ajit pawar exposed him
महत्वाच्या बातम्या
- ‘मी नसतो तर मुख्यमंत्री अशोक गेहलोत तुरुंगात गेले असते’, राजस्थानचे माजी मंत्री राजेंद्र गुढा यांचा गौप्यस्फोट!
- दिल्लीत पावसाचा कहर, यमुनेने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी; सखल भागातून लोकांचे स्थलांतर, हिमाचलच्या पुरात 7 ठार
- खलिस्तान्यांना ड्रग्स तस्करांची फंडिंग, NIAच्या आरोपपत्रात दहशतवादी भरतीसह आंतरराष्ट्रीय संबंधही उघड
- Gyanvapi Case : ‘ज्ञानवापी’चे ASI सर्वेक्षण सुरू, ३०पेक्षा अधिक सदस्यांची टीम सकाळीच झाली दाखल!