अनिल अंबानींच्या कंपनीकडून 5 विमानतळे परत घेणार महाराष्ट्र सरकार, कंपनीने पेमेंट आणि देखभाल केली नाही


वृत्तसंस्था

मुंबई : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या अनिल अंबानींकडून महाराष्ट्र सरकार 5 विमानतळे परत घेण्याची तयारी करत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी महाराष्ट्र विधानसभेत सांगितले की, सरकार लवकरच अनिल अंबानी समूहाकडून लातूर, उस्मानाबाद, नांदेड, यवतमाळ आणि बारामती विमानतळ परत घेऊ शकते.Maharashtra Govt to take back 5 airports from Anil Ambani’s company, the company has not made payments and maintenance

2008-2009 मध्ये सरकारने विमानतळाच्या देखभालीची जबाबदारी अनिल अंबानींच्या रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स लिमिटेडकडे सोपवली होती. आता अंबानींची कंपनी ना विमानतळाची देखभाल करत आहे ना थकबाकी भरत आहे.या पाचही विमानतळांसाठी रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स लिमिटेडने सर्वाधिक 63 कोटी रुपयांची बोली लावली होती.

महाराष्ट्र सरकार अॅटर्नी जनरल यांचे कायदेशीर मत घेणार

रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स लिमिटेडकडून थकबाकी कशी वसूल करायची तसेच, त्याऐवजी सरकार विमानतळाचा पूर्ण ताबा घेऊ शकते का? याबाबत सरकार अॅटर्नी जनरल यांचे कायदेशीर मत मागणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

नांदेड, लातूर विमानतळाचे काम रखडले

विधानसभेत बोलल्यानंतर फडणवीस यांनी ट्विट केले की, ‘नांदेड, लातूर विमानतळाचे काम ठप्प झाले आहे. ज्या कंपनीला हे काम दिले होते त्यांनी थकबाकी भरलेली नाही. एजी (अॅटर्नी-जनरल) यांचे मत घेतले जाईल आणि आम्ही हे काम जलद करू. यासोबतच त्यांनी त्या ट्विटमध्ये विमानतळाशी संबंधित इतर प्रकल्पांची माहिती दिली होती.

नुकतेच अनिल आणि टीना अंबानी ईडीसमोर हजर झाले

अलीकडेच अनिल अंबानी आणि त्यांची पत्नी टीना अंबानी परकीय चलन उल्लंघन प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ED) अधिकाऱ्यांसमोर हजर झाले. अनिल आणि त्यांच्या पत्नीवर परदेशातील संपत्ती लपविल्याचा आणि निधीची उलाढाल केल्याचा आरोप आहे.

अनिल एके काळी भारतातील तिसरे श्रीमंत उद्योगपती होते

फोर्ब्स इंडियाच्या मते, 2007 मध्ये अनिल यांची एकूण संपत्ती 45 अब्ज डॉलर होती. त्यावेळी ते देशातील तिसरे श्रीमंत व्यापारी होते. यानंतर, त्यांचे कर्ज वाढतच गेले आणि निव्वळ संपत्ती कमी होत गेली. 2020 मध्ये अनिल अंबानी यांनी यूके कोर्टात सांगितले होते की, सध्या त्यांची संपत्ती शून्य आहे.

Maharashtra Govt to take back 5 airports from Anil Ambani’s company, the company has not made payments and maintenance

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात