विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदनिष्ठ विरुद्ध अजित निष्ठा अशी फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना खरा पक्ष कोणाकडे हे ठरवण्यासाठी नोटीसा पाठवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शरदनिष्ठ गट घड्याळ चिन्ह गमावण्याचा धोका त्याच गटातल्या नेत्यांना वाटतो आहे. स्वतः आमदार रोहित पवारांनी तशी कबुलीच देऊन टाकली आहे. Rohit pawar admits sharad pawar loyalists NCP may lose its election symbol ready to accept new one
निवडणूक आयोग कोणाच्या बाजूने निकाल देईल?, त्याचा अंदाज सर्वांना आला आहे. त्यामुळे जनतेलाच विचारून शरद पवारांना कोणते चिन्ह हवे हे ठरविले जाईल आणि त्यानुसारच निवडणुकीला सामोरे जाऊ, असे वक्तव्य रोहित पवारांनी विधिमंडळ परिसरात केले आहे. ही एक प्रकारे शरदनिष्ठ गट घड्याळ चिन्ह गमावण्याचीच कबुली आहे.
तसेही शरद पवार यांनी स्वतःच चिन्ह फारसे महत्त्वाचे नसते. आत्तापर्यंत आपण चार चिन्हांवर निवडणुका लढवून जिंकल्या आहेत, असे वक्तव्य केलेच होते. त्यातूनच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांकडे सरेंडर केल्याचे दिसून आले आणि आता शरदनिष्ठ गटाचे आमदार रोहित पवारांनी देखील घड्याळ चिन्ह गमावण्याचीच कबुली देऊन टाकली आहे.
अजित पवारांसह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. यानंतर खरी राष्ट्रवादी कोणाची हा मुद्दा उपस्थित झाला आहे. यावरून निवडणूक आयोगाने बुधवारी ( २६ जुलै ) शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला नोटीस बजावली आहे.
विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले, गेल्या काही वर्षात निवडणूक आयोग सत्तेतील लोकांची बाजू घेते, असं मत सामान्य लोकांचे झाले आहे. निवडणूक आयोगाने नोटीस बजावली असून ती एक प्रक्रिया आहे.
पण, निवडणूक आयोग कोणाच्या बाजूने निर्णय देईल, याचा अंदाज सर्वांना आहे. आम्ही न्यायालयातही लढाई लढू. पण, येत्या काळात लढत असताना घड्याळ चिन्ह राहिले नाही, तरी लोकांनाच विचारावे शरद पवार यांना कोणतं चिन्ह मिळालं पाहिजे. ते चिन्ह मिळाल्यानंतर लोकांना विश्वासात घेऊन येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जावं लागणार, याचा अंदाज आला आहे. चिन्हापेक्षा विचार महत्वाचे आहेत. शरद पवारांबरोबर राहून लढतोय हे आमच्यासाठी महत्वाचं आहे, असेही रोहित पवार यांनी नमूद केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more