इतरांनी सायडिंग टाकलेल्या गाड्या मेन लाईन वर आणून नव्या पक्षाच्या भरण पोषणाची शरद पवारांची रणनीती!!


नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून 54 पैकी बहुसंख्य आमदारांनी अजित पवारांच्या गोटात भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाणे पसंत केल्यानंतर शरद पवारांनी आता आपल्या नव्या पक्षाच्या भरण पोषणाची नवीन रणनीती आखल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. Sharad pawar to find second rank or sidelined leaders of BJP to empower his new political outfit

शरद पवारांनी म्हणे त्रिस्तरीय रणनीती आखली असून त्यामध्ये स्वतःच्या पक्षातल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना समोर आणणे, भाजप मधल्या जुन्या आणि दुर्लक्षित नेत्यांना पुढे आणणे, तसेच पूर्णपणे नव्या कार्यकर्त्यांना बळ देणे या तीन मुद्द्यांचा त्यात समावेश आहे. “पवारांची नवी खेळी”, “पवारांची पॉवरफुल खेळी” अशा शीर्षकांनी पवारांच्या या रणनीतीच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. शरद पवारांनी आत्तापर्यंत अशी अनेक बंडे पचवली आणि ते नवा पक्ष उभा करून पुन्हा जनतेला सामोरे गेले, असे त्या बातम्यांमध्ये नमूद केले आहे. यातली “पवारांची नवी खेळी”, “पॉवरफुल खेळी” ही मराठी माध्यमांची नित्याचीच भाषा आहे.

पण त्या पलीकडे जाऊन शरद पवारांच्या नव्या स्ट्रॅटेजीवर दृष्टीक्षेप टाकला, तर त्यांनी स्वतःच किंवा बाकीच्या पक्षांनी सायडिंगला टाकलेल्या गाड्या मेन लाईनवर आणून स्वतःच्या पक्षाचे भरण पोषण करण्याची नवी रणनीती आखल्याचे दिसून येते. यापेक्षा वेगळे काही नाही. शिवाय ही रणनीती देखील स्वतःच्या पुणे जिल्ह्यापुरती आणि राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या जिल्ह्यांपुरती मर्यादित असल्याचे मराठी माध्यमांनी नमूद केले आहे.म्हणजे तूर्तास पवारांची पुणे जिल्ह्यात भाजपच्या जुन्या नेत्यांना राष्ट्रवादीत आणून पक्ष बळकट करण्याची रणनीती असल्याचे बोलले जात आहे. मात्र, पुणे जिल्ह्यात असे कोणते जुने भाजप नेते उरले आहेत की जे पवारांच्या नेतृत्वाखाली येऊन राष्ट्रवादीला बळकटी देतील??, याचा खुलासा मराठी माध्यमांनी केलेला नाही. त्याचबरोबर पवारांनी राष्ट्रवादी फुटल्यानंतर येवला वगळता बाकी कुठेही दौरा केलेला नाही. बारामतीत तर ते फिरकलेही नाहीत. पण त्याआधीच निवडणूक आयोगाच्या नोटीसीला त्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी फुटली की नाही यावर पवारांना अधिकृत भूमिका घ्यावी लागणार आहे.

– रोहित पवारांची चिन्ह गमावल्याची कबुली

या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी केलेले एक वक्तव्य महत्त्वाचे आहे. निवडणूक आयोग चिन्हाबाबत आणि पक्षाबाबत काय निर्णय देईल, याचा अंदाज सर्वांना आला आहे. त्यामुळे न्यायालयीन लढाई लढू आणि समजा घड्याळ हे पक्ष चिन्ह गेले तरी जनतेला विचारून शरद पवार नवे पक्ष चिन्ह ठरवून निवडणुकीला सामोरे जातील असे वक्तव्य रोहित पवारांनी केले आहे. हे “सूचक” वगैरे वक्तव्य नसून ते थेटच वक्तव्य आहे. शरद पवारांनी आपणच स्थापन केलेली राष्ट्रवादी अजित पवारांना सरेंडर करून टाकल्याचे ते निदर्शक आहे.

पण याचा अर्थ असा की आपणच स्थापन केलेली राष्ट्रवादी काँग्रेस चिन्हासकट गमावल्यानंतर शरद पवार हे आपला नवा पक्ष उभारताना नवा पक्ष उभारताना बाकीच्या पक्षांमध्ये सायडिंगला टाकलेल्या गाड्या मेन लाईनवर आणून स्वतःचा नवा पक्ष बळकट करणार आहेत, हेच यातून स्पष्ट होते.

Sharad pawar to find second rank or sidelined leaders of BJP to empower his new political outfit

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात