दरोडेखोरांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर घातली गाडी, पुणे – मुंबई एक्सप्रेस वे वर उर्से टोलनाक्यावर प्रकार


पुणे – मुंबई एक्सप्रेस वे वर उर्से टोलनाक्यावर दरोडेखोरांनी अंगावर गाडी घालून एका पोलीस कर्मचाऱ्याला गंभीर जखमी केले आहे. मध्य प्रदेशातील नऊ दरोडेखोरांना पोलिसांनी पकडले आहे. Robbers hitted a policeman at Urse toll plaza on Pune-Mumbai Expressway


विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे – मुंबई एक्सप्रेस वे वर उर्से टोलनाक्यावर दरोडेखोरांनी अंगावर गाडी घालून एका पोलीस कर्मचाऱ्याला गंभीर जखमी केले आहे. मध्य प्रदेशातील नऊ दरोडेखोरांना पोलिसांनी पकडले आहे. मध्यप्रदेश येथील काही दरोडेखोर मुंबईहून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाने येणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, उर्से टोल नाका येथे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेत असताना एका गाडीसह आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. गुंडा स्कॉड चे पोलीस कर्मचारी शुभम तानाजी कदम यांच्या अंगावर गाडी घातली यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन कदम यांची विचारपूस केली आहे. डोंगराळ परिसरात पळून गेलेल्या आरोपींचा मध्यरात्री पर्यंत शोध सुरू होता. आत्तापर्यंत नऊ दरोडेखोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून आणखी काही दरोडेखोर हे डोंगराळ परिसरात लपून बसले असल्याचं सहायक पोलिस निरीक्षक हरीश माने यांनी सांगितले आहे.मध्यप्रदेश येथील अट्टल गुन्हेगार आणि दरोडेखोर हे मुंबईहून पुण्याचे दिशेने पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर येणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी उरसे टोल नाका येथे सापळा रचला. दरोडेखोर दोन गाड्यांमध्ये होते. ते उर्से टोल नाका येथे येताच त्यांना गाडीतून खाली उतरण्यास पोलिसांनी सांगितले. पैकी एका गाडीतील पाच जण खाली उतरले तर इतर दरोडेखोर पोलिसांना बघून गाडीसह पळण्याचा प्रयत्न केला. गुंडा स्कॉड च्या कदम यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता यात दरोडेखोरांच्या गाडीचा डॅश लागल्याने पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. गाडी तशीच मुंबई च्या विरुद्ध दिशेने घेऊन जात काही अंतरावर थांबले आणि गाडीतील दरोडेखोरांनी डोंगराळ परिसरात पसार झाले. पैकी काही जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून आत्तापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. उर्से टोल नाका परिसरातील डोंगराळ भागात पोलिसांचा मोठा फौज फाटा होता. मध्यरात्री पर्यंत पोलीस त्यांचा शोध घेत होते.

Robbers hitted a policeman at Urse toll plaza on Pune-Mumbai Expressway

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात