पंकजा मुंडें म्हणाल्या की , ‘सध्या राजकारण हे पोरखेळ वाटायला लागले आहे. राज्यात बिगबॉसचा शो सुरू आहे की काय? अशी शंका येते.Right now, politics is starting to feel like a child’s play – Pankaja Munde
विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : सध्या आर्यन खान प्रकरण आणि ड्रग्सवरून जोरदार राजकारण सुरू झालं आहे. विरोधी पक्षनेते एकमेकांवर आरोप – टीका करण्यात व्यस्त आहेत. विशेषत: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होत असताना दिसत आहेत.
याच आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. पंकजा मुंडे जिल्ह्यातील पाथर्डीमध्ये विविध विकास कामांच्या भूमीपूजन कार्यक्रमावेळी बोलत होत्या.यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर देखील निशाणा साधला आहे.
यावेळी पंकजा मुंडें म्हणाल्या की , ‘सध्या राजकारण हे पोरखेळ वाटायला लागले आहे. राज्यात बिगबॉसचा शो सुरू आहे की काय? अशी शंका येते. कारण आरोप-प्रत्यारोपामध्ये विकासाचा मुद्दा बाजूला पडला आहे. तर दाऊत, अंडरवर्ल्ड, ड्रग्ज माफिया हे सर्व विषय पुढे येत आहे.
दरम्यान हे राज्याचे दुर्दैव असल्याचे वाटतं आहे.कारण हे सर्व कोण आणते महाराष्ट्रात असा प्रश्न विचारला जात नाही. याला कुठेना कुठे आळा घालण्याचे काम हे सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचे असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App