गुजरातमध्ये ड्रग्ज माफियांविरुद्ध कायद्याचा प्रहार; 58 दिवसांत 90 आरोपी पकडले; 5756 किलो ड्रग्ज जप्त!!


वृत्तसंस्था

अहमदाबाद : गुजरातमध्ये ड्रग्ज माफियांविरुद्ध कायद्याचा प्रहार सुरू असून गेल्या 58 दिवसांमध्ये 90 आरोपींना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून तब्बल 5756 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. Legal action against drug mafias in Gujarat; Caught 90 accused in 58 days; 5756 kg drugs seized !!

पाकिस्तानातून तस्करी करून समुद्र मार्गाद्वारे हे ड्रग्ज गुजरातमध्ये आले होते. द्वारकेमध्ये ठाण्यातल्या भाजीवाल्याला साडे तीनशे किलो ड्रग्ज सह अटक झाल्याची बातमी मराठी माध्यमांनी चालविली आहे. प्रत्यक्षात गेल्या 58 दिवसांत सुरू असलेल्या माफियांवरील कारवाई मधला तो एक घटक आहे. मुम्बरा येथील सज्जादला त्याच्या तीन साथीदारांसह गुजरात पोलिसांनी द्वारकेमध्ये अटक केली. त्याच्याकडे सुमारे साडेतीनशे किलोमीटर किलो ड्रग्ज आढळली. सज्जाद विरोधात एक खुनाचा गुन्हा देखील असून त्याला यापूर्वी अटक झाली होती.



गुजरातमध्ये ड्रग्ज माफियांवरच्या कारवाईची माहिती राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी पत्रकारांना दिली आहे. गुजरात मधील किनारपट्टीवर पोलिसांच्या विशेष टीम गेल्या तीन महिन्यांपासून कार्यरत आहेत आणि त्यांनी अनेक ठिकाणी धाडसी कारवाया करून ड्रग्जच्या खेपा पकडल्या आहेत. यामधल्या 90 आरोपींना गजाआड करण्यात आले असून आणखी काही आरोपींचा शोध घेऊन त्यांना देखील गजाआड करण्यात येईल, अशी माहिती हर्ष संघवी यांनी दिली आहे.

पाकिस्तानातून समुद्रमार्गाने मोठ्या प्रमाणावर तस्करीचे प्रकार लक्षात आल्यानंतर राज्यातले गुजरातमधले पोलीस हायअलर्ट वर आहेत. किनारपट्टीवरची गस्त वाढवण्यात आली आहे. ड्रग्ज माफियांविरुद्ध कारवाईसाठी नौदलाच्या कोस्ट गार्डची देखील मदत घेण्यात येत आहे, अशी माहिती संगवी यांनी दिली आहे.

Legal action against drug mafias in Gujarat; Caught 90 accused in 58 days; 5756 kg drugs seized !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात