विशेष प्रतिनिधी
मुंबई : जगात सर्वाधिक हुशार असणाऱ्या व्यक्ति कोण असं म्हटलं तर आपलं ठरलेलं उत्तर असतं ते म्हणजे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन आणि न्युटन. मात्र यांच्यापेक्षाही सर्वाधिक बुद्ध्यांक असलेल्या व्यक्ती आहेत. त्यांच्याविषयीची माहिती सोशल मीडियावरुन, वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाली आहे. आता आपण महाराष्ट्रातल्या ऋचा चांदोरकरविषयी जाणून घेणार आहोत. तिनं चक्क अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या बुद्धयांकाचा विक्रम मोडीत काढला आहे. आणि आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे. सध्या ऋचाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. Rhythm heavy! Maharashtra’s Richa Chandorkar leaves ‘Einstein’ behind … Discussion on social media.
महाराष्ट्रातील नागपूर येथील ऋचानं सर्वाधिक बुद्धयांक असणारी व्यक्ती होण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळे तिचा समावेश आता जगातील सर्वात जास्त आय क्यु असणारी व्यक्तींच्या यादीत झाला आहे. मेन्सा सोसायटीनं ऋचाची चाचणी घेतली. त्यातून हे अनुमान नोंदवले आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, ऋचाचा आय क्यु हा महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईनपेक्षाही अधिक आहे. अल्बर्ट आईनस्टाईन यांचा आय क्यु हा 160 होता. ऋचाचा स्कोअर 162 इतका झाला आहे. असा विक्रम आपल्या नावावर करणारी ती पहिली मुलगी आहे.
याशिवाय ऋचाच्या भावानं देखील आय क्यु शी संबंधित 2016 मध्ये एक टेस्ट दिली होती. त्यावेळी त्याचा स्कोअर 160 इतका झाला होता. मात्र आता ऋचानं आपल्या भावाला देखील मागे टाकलं आहे. 2019 मध्ये ऋचाचं कुटूंब हे स्कॉटलँडमध्ये स्थलांतरित झालं होतं. तिचे आई वडिल हे आयटीमध्ये कार्यरत आहे. रुचानं सांगितलं की, जेव्हा तिच्या भावानं आय क्यु ची टेस्ट दिली होती. त्याचवेळी मी ठरवलं होतं की, मला देखील ही चाचणी द्यायची आहे. आणि त्यात यशस्वी व्हायचे आहे. 11 वर्षांची झाल्यानंतर ही चाचणी मला देता आली. माझा स्कोअर एवढा होईल असे कधी वाटले नव्हते. मात्र जेव्हा निकाल हाती आला तेव्हा कमालीचा आनंद झाला. अशी भावना ऋचानं व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App