वृत्तसंस्था
पुणे : वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्यात संदर्भात पुणे आणि औरंगाबादेत सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी छापेमारी करत आहे. सुमारे 7.76 करोडो रुपयांच्या घोटाळ्यात अनेकांच्या जमिनी बेकायदा हडपल्याचे आरोप आहेत.ED raids in Pune, Aurangabad in Waqf Board land scam; Waqf Board comes under the account of Nawab Malik
ईडीच्या छापेमारीचे निष्कर्ष अजून बाहेर आले नसले तरी पुणे आणि औरंगाबाद या दोन शहरांमध्ये सात – आठ ठिकाणी एकाच वेळी ईडीने छापेमारी सुरू ठेवली आहे.ऑगस्ट महिन्यामध्ये वक्फ बोर्डाच्या एका ट्रस्टीला अटक करण्यात आली होती. जमीन वक्फ बोर्डाची असताना स्वतःच्या नावाने व्यवहार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
Maharashtra | Enforcement Directorate is conducting raids at seven locations in Pune, in connection Waqf Board land scam case — ANI (@ANI) November 11, 2021
Maharashtra | Enforcement Directorate is conducting raids at seven locations in Pune, in connection Waqf Board land scam case
— ANI (@ANI) November 11, 2021
त्याचबरोबर वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनी शेजारच्या जमिनी देखील हडपल्याचा आरोप काही ट्रस्टींवर आहे. यासंदर्भात ही छापेमारी सुरू आहे.राज्याचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री नवाब मलिक यांच्या खात्यांतर्गत वक्फ बोर्ड येत असते. या खात्यामध्ये झालेल्या मोठ्या जमीन घोटाळ्याबाबत ईडी आता मोठी कारवाई करताना दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App