देशभक्तीची प्रेरणा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला.दरवर्षी 26 जानेवारीला हे या तलावाच्या मधोमध पोहत जातात.Republic Day: Divyang girl hoisted flag at Ambazhari Lake in Nagpur
विशेष प्रतिनिधी
नागपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त नागपुरातील काही लोक दरवर्षी अंबाझरी तलावातील पाण्यावर झेंडा फडकवतात.तसेच राष्ट्रगीत गाऊन प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.देशभक्तीची प्रेरणा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला.दरवर्षी 26 जानेवारीला हे या तलावाच्या मधोमध पोहत जातात.
त्या ठिकाणी झेंडा फडकावितात.पाण्यातच राहून राष्ट्रगीत गातात.देशाप्रती प्रेम आणि अनोखं झेंडावंदन बघण्यासाठी या ठिकाणी लोकसुद्धा मोठ्या उत्साहाने येतात.जवळपास पाचशे मीटरचे अंतर हे लोक पोहून जातात.पाण्यावर उंच ठिकाणी झेंडा फडकवतात.
ही परंपरा गेल्या 25 वर्षापासून सुरू आहे. दरवर्षी यात नवनवीन लोकं सहभागी होतात.ही सर्व मंडळी वर्षभर या तलावात पोहतात.दरम्यान 26 जानेवारी आणि 15 आगस्टला या ठिकाणी झेंडावंदन करतात, अशी माहिती स्वीमर दिव्यांग मुलगी तसेच आयोजकांनी दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App