वृत्तसंस्था
मुंबई : चक्रीवादळात उन्मळून पडलेल्या वृक्षांचे पुनर्रोपण करून जगवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. गोरेगाव येथील चार वृक्षांना आणि वरळी येथे सहा झाडांना नवसंजीवनी देण्याचा खटाटोप सुरु आहे. Replanting Fallen Trees Under Guidance Experts
गेल्या आठवड्यात चक्रीवादळाने मुंबईत धुमाकूळ घातला. वादळी वारा, मुसळधार पावसामुळे आठशेहून अधिक झाडे उन्मळून पडली. रस्ते, घरे, गृहसंस्थांच्या आवारात पडलेली झाडे हटवण्यासाठी तातडीने प्रयत्न पालिकेने सुरू केले. झाडांचे तुकडे करून त्यांना हटवले.
आरे परिसरातील झाडांचे ओंडके कापून त्यांना हटवण्यापेक्षा जगवण्याचा प्रयत्न ‘रिवायडिंग आरे’ या संस्थेचे कार्यकर्ते करत आहेत. अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले.
त्यासाठी लागणारे साहित्य, यंत्रे आणि आर्थिक गणिते जमवून निधी उभारला आला. आंबा, पिंपळ, आकाशनिंब अशा झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. एका झाडामागे १० हजार रुपये खर्च आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App