विशेष प्रतिनिधी
मुंबई : मागील वर्षी मजाक मध्ये एक कागद पोलिसात दिला तर तुमचे मंत्री पद धोक्यात आले होते, आता पुन्हा तीच माझ्यावर बलात्कार झाला असल्याची तक्रार करून सोशल मीडियावरून बदनामी करून तुमचे मंत्रीपद घालवेन, असे होऊ द्यायचे नसेल तर मला ५ कोटी कॅश आणि ५ कोटींचे दुकान घेऊन द्या, असे ब्लॅकमेलिंग करत अशा प्रकारची खंडणीची मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना कथित रेणू शर्मा नामक महिलेने केली. मुंडे यांनी मुंबई क्राईम ब्रँच मध्ये धाव घेत महिलेविरुद्ध खंडणी मागितल्याची तसेच ब्लॅकमेलिंग करत असल्याची पुराव्यांसह तक्रार दिली. Renu Sharma arrested for blackmailing Dhananjay Munde Complaint of ransom demand in Mumbai Crime Branch
तथाकथित रेणू शर्मा या महिलेने मागील वर्षी जानेवारी महिन्यात धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करत खळबळ माजवली होती, त्यानंतर काही दिवसातच तिने तक्रार माघारी घेतली होती.
तेव्हापासून रेणू शर्मा ही परदेशातील नंबर वापरून मेसेज, व्हाट्सएप तसेच फोन करून पैश्यांची मागणी करत होती. यासंदर्भातील सर्व पुरावे धनंजय मुंडे यांनी पोलिसात दिले असल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
‘पिछले साल एक कागज सोशल मीडिया पर डाला तो तुम्हारा मंत्री पद जानेकीं नौबत आ गई थी. अब अगर मेरी मांग पूरी नहीं की तो बदनाम कर दुँगी. अगर मंत्री पद बचाना चाहते हो, तो दस करोड कौनसी बडी बात है?’ अशा आशयाचे मेसेज सदर महिला पाठवत असून, याद्वारे ५ कोटी रुपये कॅश व ५ कोटी रुपयांचे दुकान विकत घेऊन देण्याची मागणी रेणू शर्माने केली असल्याचे मुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
रेणू शर्मा ही महिला मूळ इंदौर मध्य प्रदेशातील असून ती करुणा शर्माची बहीण आहे, मुंडे यांच्या तक्रारीनंतर मुंबई क्राईम ब्रँच व इंदूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला अटक केली. आधी कोर्टात हजर केले होते. इंदूर कोर्टाने तिला रिमांड दिला आणि त्यानंतर आज (दि. 21) रोजी या महिलेला पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
सदर रेणु शर्मावर इतर अनेक व्यक्तींनीही ब्लॅकमेलिंग संदर्भातल्या तक्रारी यापुर्वी अनेकदा विविध पोलीस ठाण्यात दाखल केल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App