कॅमेरे भाडेतत्वावर घेऊन त्यांची परस्पर विक्री करत अपहार करणारा भामटा पोलिसांचा जाळ्यात आला आहे.Rented Camera robbing accuse Arrested by Pune police
विशेष प्रतिनिधी
पुणे – दुकानातून कॅमेरे भाडेतत्वावर घेऊन त्यांची परस्पर विक्री करत अपहार करणाऱ्याला एकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.Rented Camera robbing accuse Arrested by Pune police
लक्ष्मण नामदेव सांगळे (19, रा. नऱ्हे गाव, भुमकर पेट्रोलपंप, सिंहगडरोड मुळ रा. शिवपार्वतीनगर, ठाकरे चौक, पंढरपूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत गगन विजयकुमार जाधव (189, रा. तिरंगा चौक, दिव्यस्पूर्ती सोसायटी, दत्तनगर, आंबेगाव रोड, आंबेगाव खुर्द) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
जाधव यांचा कॅमेरे भाडेतत्वावर देण्याचा व्यावसाय आहे. दि. 9 फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास आरोपी सांगळे याने एक महागडा कॅमेरा भाडेतत्वार घेतला. परंतु, त्याने वेळेत कॅमेरा परत न दिल्याने जाधव यांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलिसांकडे तक्रार दिली.
त्यानंतर गुन्ह्याचा तपास करत असताना सहायक पोलिस निरीक्षक वैभव गायकवाड यांना आरोपीचा शोध घेत असताना अमंलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे आणि सचिन गाडे यांना आरोपीबाबत माहिती मिळाली. तसेच सांगळे हा पुणे शहरातून अशाच पध्दतीने कॅमेरे भाडेतत्वार घेत असल्याचे समजले. तसेच तो नऱ्हे येथे राहण्यास असल्याचे समजले.
त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर याबाबत माहिती देऊन सांगळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता अशा पध्दतीने कॅमेरे भाडेतत्वावर घेऊन विक्री करत असल्याचे त्याने सांगितले.
गुन्हे निरीक्षक संगिता यादव, विजय पुराणिक, उपनिरीक्षक नितीन शिंदे, हर्षल शिंदे, गणेश शेंडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांनी ही कारवाई केली. पुणे व आसपासच्या परिसरातून अशा पध्दतीने कोणी कॅमेरे भाडेतत्वार दिले आणि ते परत मिळाले नसल्यास पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे अवाहन भारती विद्यापीठ पोलिसांनी केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App