टेलरिंगच्या दुकानात काम करणाऱ्या एका कामगारास कामावरुन काढल्याच्या कारणावरुन, त्याने एका ३२ वर्षीय महिलेच्या अंगावर पेट्राेल टाकून पेटती सिगारेट तिच्या अंगावर टाकून देत तिला पेटवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. Remove from the work reason Telaring worker burn the teloring owner lady in Vadgaonsheri area
विशेष प्रतिनिधी
पुणे : टेलरिंगच्या दुकानात काम करणाऱ्या एका कामगारास कामावरुन काढल्याच्या कारणावरुन, त्याने एका ३२ वर्षीय महिलेच्या अंगावर पेट्राेल टाकून पेटती सिगारेट तिच्या अंगावर टाकून देत तिला पेटवून दिल्याचा प्रकार साेमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वडगावशेरी परिसरात घडला. पेटलेल्या महिलेने हल्लाखाेर कामगारास पकडून ठेवल्याने त्याचा या घटनेत मृत्यु झाला आहे तर महिला ९० . उपचार करण्यात येत आहे.
मिलिंद गाेविंदराव नाथसागर (वय-३५,रा.वडगावशेरी,पुणे, मु.रा.परभणी) असे मयत झालेल्या इसमाचे नाव आहे. या घटनेत बाला नाेया जॅनिंग (३२,रा.वडगावशेरी,पुणे , मु.रा.ओरिसा) ही महिला गंभीर जखमी झाली आहे. तर, नाथसागर याचा मित्र प्रशांतकुमार सुतांशकुमार देबनार (३२) हा या घटनेत जखमी झाला असून ताे सुमारे ३५ टक्के भाजला गेला आहे. याबाबत चंदननगगर पाेलीसांकडे बाला जॅनिंग या महिलेने तक्रार नाेंदवली आहे. बाला जॅनिंग ही महिला मुळची ओरिसा येथील रहिवासी असून ती आठ वर्षापूर्वी टेलरिंगच्या कामा निमित्ताने पुण्यात आली. वडगावशेरी परिसरात पाेलीस लाईनीत मांदळे निवास याठिकाणी तिचे ‘ए टु झेड’ हे टेलरिंगचे दुकान आहे.
आराेपी मिलिंद नाथसागर हा तिच्याकडे कामाला हाेता परंतु ताे व्यवस्थित काम करत नसल्याने त्याला आठ दिवसांपूर्वी जॅनिंग यांनी कामावरुन काढून टाकला हाेता. त्याचा राग मनात धरुन साेमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आराेपी मिलिंद नाथसागर टेलरिंगच्या दुकानात आला व त्याने साेबत आणलेल्या डब्यातील पेट्राेल महिलेच्या अंगावरटाकले. त्यानंतर सिगारेट लायटरने पेटवून ती महिलेच्या अंगावर टाकली या घटनेत महिला भाजून गंभीर जखमी झाली. तिने मिलिंद नाथसागर यास पेटलेल्या अवस्थेत पकडून ठेवल्याने ताे ही ९० टक्के भाजून ताे गंभीररित्या जखमी झाला. त्याला साेडविण्याकरिता त्याचा माेबाईल शाॅपीत काम करणारा मित्र प्रशांतकुमार देबनार हा आला असता ताे सुध्दा ३५ टक्के भाजून जखमी झाला आहे अशी माहिती वरिष्ठ पाेलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी दिली आहे. याबाबत पाेलीस उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड पुढील तपास करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App