Reliance AGM 2021 : काल झालेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये स्वस्त जिओ 5 जी फोन ते 5 जी नेटवर्क, रिटेल सेक्टर आणि ग्रीन एनर्जीसह अनेक घोषणा करण्यात आल्या. अंबानी म्हणाले की, यंदाच्या गणेश चतुर्थीनिमित्त म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी स्वस्त 5 जी फोन लाँच केला जाईल, हा फोन कंपनीने गुगलच्या सहकार्याने तयार केला आहे. मुकेश अंबानी यांनी आणखी कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले त्याबद्दल जाणून घेऊया… Reliance AGM 2021 From 10 lakh Jobs To 15 thousand crore investment Know Mukesh Ambani Top Ten Decisions
विशेष प्रतिनिधी
मुंबई : काल झालेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये स्वस्त जिओ 5 जी फोन ते 5 जी नेटवर्क, रिटेल सेक्टर आणि ग्रीन एनर्जीसह अनेक घोषणा करण्यात आल्या. अंबानी म्हणाले की, यंदाच्या गणेश चतुर्थीनिमित्त म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी स्वस्त 5 जी फोन लाँच केला जाईल, हा फोन कंपनीने गुगलच्या सहकार्याने तयार केला आहे. मुकेश अंबानी यांनी आणखी कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले त्याबद्दल जाणून घेऊया…
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी म्हणाले की, JioPHONE NEXT 5G फोन Jio आणि Google च्या अँड्रॉइड OSचे ऑप्टिमाइझ्ड व्हर्जन आहे. हे सर्वात स्वस्त आणि प्रगत वैशिष्ट्यांसह सज्ज आहे. हा फोन गणेश चतुर्थी म्हणजेच 10 सप्टेंबरपासून बाजारात उपलब्ध होणार आहे. जियोकडून तुम्ही जशा अपेक्षा ठेवत आला आहात, त्याप्रमाणे माझे वचन आहे की जिओ फोन नेक्स्ट केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर सर्वाधिक स्वस्त स्मार्टफोनपैकी एक असेल.
मुकेश अंबानी म्हणाले की, आम्ही जागतिक भागीदारांसह 5 जी इकोसिस्टिम विकसित करण्यासाठी आणि 5 जी उपकरणांची श्रेणी विकसित करण्यासाठी कार्यरत आहोत. जिओ केवळ भारत 2G मुक्त करण्यासाठीच कार्य करत नाही तर 5 जी युक्तही करत आहे. डेटा वापरण्याच्या बाबतीत जिओ जगातील दुसर्या क्रमांकाचे नेटवर्क बनले आहे. रिलायन्स जिओच्या नेटवर्कवर दरमहा 630 कोटी जीबी डेटा वापरला जातो. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 45 टक्के जास्त आहे.
रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की, आम्ही देशात 5 जी नेटवर्कसाठी सज्ज आहोत. आम्ही देशात प्रथम 5 जी सेवा देऊ. त्याच्या चाचणीमध्ये 1 जीबीपीएसचा वेग मिळाली आहे. यासाठी Google क्लाऊड आणि जिओ यांच्यात भागीदारी झाली आहे.
मुकेश अंबानी म्हणाले की, आरआयएलने एका वर्षात सर्वाधिक भांडवल उभे केले. ते म्हणाले की, जिओ प्लॅटफॉर्म हा देशातील सर्वात मोठा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. रिलायन्स जिओच्या युजर्सची संख्या सातत्याने वाढत आहे.
एजीएम 2021 मध्ये अंबानी म्हणाले की, कोरोना कालावधी असूनही रिलायन्स जिओने चमकदार कामगिरी केली. ते म्हणाले की, चिनी कंपनी सोडून जिओ कोणत्याही एका देशात 400 कोटींहून अधिक ग्राहक असलेली पहिली कंपनी बनली आहे. यामुळे रिलायन्स जिओ आज जगातील दुसर्या क्रमांकाची मोबाइल डेटा हाताळणारी कंपनी बनली आहे.
अंबानी म्हणाले की, आठपैकी एक भारतीय रिलायन्स रिटेलमधून शॉपिंग करतोय. रिलायन्स रिटेलचा व्यवसाय सर्वात वेगाने वाढला आहे. ते म्हणाले की, गेल्या वर्षी 1500 नवीन स्टोअर उघडण्यात आले. अॅपरेल बिझमध्ये 1 वर्षात 18 कोटी युनिटची विक्री झाली. कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्समधील परिस्थिती आणखी बळकट झाली.
रिलायन्सचा प्लॅन आहे की, पुढच्या तीन वर्षांत त्यांच्या ई-कॉमर्स व्हेंचर जिओ मार्टवर एक कोटींहून जास्त मर्चंट पार्टनर्स जोडले जावेत. यासोबतच रिलायन्स रिटेल या वर्षी आपल्या स्टोअर्सची संख्याही अनेक पटींनी वाढवणार आहे.
मुकेश अंबानी पुढे म्हणाले की, रिटेल क्षेत्रात पुढील तीन वर्षांत रिलायन्स सुमारे 10 लाख लोकांना नोकर्या देईल. सोबतच ते म्हणाले की, गेल्या एका वर्षात रिलायन्स रिटेलने 65000 नवीन रोजगार निर्माण केले आहेत आणि त्यातील कर्मचार्यांची संख्या आता दोन लाखांपेक्षा जास्त झाली आहे.
एजीएम 2021 दरम्यान मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स व्हॅल्यू चेन पार्टनरशिप आणि भविष्यातील तंत्रज्ञानावर 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल.
मुकेश अंबानी म्हणाले की, ग्रीन एनर्जी क्षेत्रात रिलायन्स 60 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. येत्या 10 वर्षात 100 जीडब्ल्यू सौर ऊर्जा उत्पादन करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. यासाठी गुजरातमधील जामनगरमध्ये धीरूभाई ग्रीन एनर्जी कॉम्प्लेक्स सुरू होईल.
Reliance AGM 2021 From 10 lakh Jobs To 15 thousand crore investment Know Mukesh Ambani Top Ten Decisions
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App