अर्थसंकल्पात मूल्यवर्धित कर समान करण्याचा प्रस्ताव; महाराष्ट्रात पेट्रोल – डिझेल दरवाढीचा कपात!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे – फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी समाजातल्या विविध घटकांसाठी विविध सवलत योजना जाहीर केल्या. त्यामध्ये पेट्रोल, डिझेलचे दर कमी करत महायुती सरकारने वाहन चालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मूल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्या दृष्टीने ही पावलं उचलण्यात आली आहेत. Reduction in petrol-diesel price hike in maharashtra

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. पेट्रोलचे दर 65 पैशांनी, तर डिझेलचे दर 2 रुपये 07 पैशांनी कमी करण्यात आले आहे. महागाईचा फटका बसलेल्या सर्वसामान्य नागरिकांना महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यभरात पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर समान करण्याची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच व्यवसाय कर, मुद्रांक शुल्काबाबतही दिलासादायक तरतूद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अजित पवार यांनी केलेल्या घोषणेच्या अंमलबजावणीकडे आता सर्व सामान्य नागरिक आणि वाहन चालक मालक यांचे डोळे लागून राहिले आहेत.

मूल्यवर्धित कर राज्यभरात समान

पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महापालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर 24 % वरुन २१ % प्रस्तावित करण्यात आला आहे.

काय आहे प्रस्ताव?

पेट्रोलचा सध्याचा कर 26 % अधिक प्रति लिटर 5 रुपये 22 पैशांवरुन 25 % अधिक प्रति लिटर 5 रुपये 12 पैसे इतका करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे.

या बदलामुळे ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महापालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर अंदाजे पासष्ट पैसे व डिझेलचा दर अंदाजे 2 रुपये 07 पैसे प्रति लिटर इतका स्वस्त होणार आहे.

Reduction in petrol-diesel price hike in maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात