विशेष प्रतिनिधी
नगर : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार कार्यकर्त्यांच्या बळावर कर्जत जामखेड मधून निवडून आले पण त्याच कार्यकर्त्यांना त्यांनी खासगी नोकरासारखी वागणूक दिली असा आरोप करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कर्जत – जामखेड विधानसभाप्रमुख मधुकर राळेभात यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना राळेभात यांनी रोहित पवारांच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढले. Rebellion against Rohit Pawar in karjat jamkhed
मधुकर राळेभात म्हणाले :
विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचा आदर ठेवून आम्ही जामखेडच्या जनतेने एका स्थानिक कॅबिनेट मंत्र्याना पराभूत केले. रोहित पवार Rohit Pawar यांना निवडून आणले. कर्जत- जामखेड मतदार संघात जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाच्या फलकांवर प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष किंवा अन्य पदाधिकाऱ्यांचे नाव किंवा फोटो लावले जात नाहीत.
विधानसभेसाठी पवारांचा ताटातलं वाटीतचा जुनाच फॉर्म्युला; भाजपचा “असाइनमेंट” आणि पंचायत गटांवर फोकसचा फॉर्म्युला!!
मतदारसंघात 25 ते 30 वर्षापासून ज्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र पक्षासाठी काम केले. त्यांचाही सन्मान राखला जात नाही. रोहित पवार कार्यकर्त्यांना खासगी नोकरी सारखे वागवतात. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यक्रमात जेष्ठ कार्यकर्त्यांना मत मांडण्याचा अधिकार दिला जात नाही. या सर्व गोष्टींना कंटाळून आम्ही आमच्या सर्व पदांचा राजीनामा देवून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून बाहेर पडत आहोत.
कर्जत जामखेड मधून आणि कुठल्याही पक्षाने तिकीट दिले तर मी निवडणूक लढवेन पण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार नाही.
मधुकर राळेभात यांचा राजीनामा हा कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App