प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. आज संध्याकाळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उपसभापती नीलम गोऱ्हे आणि प्रकाश सुर्वे यांची उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यावेळी रवींद्र धंगेकरांसोबत अनेक कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. तीन पक्षांतर केल्यानंतर धंगेकर यांची शिवसेनेत घरवापसी झाली.Eknath Shinde
दरम्यान काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी व्हाट्सअपला स्टेटस ठेवत सगळ्यांच्या नजरा खिळवल्या आहेत. गळ्यात भगवा परिधान करून धंगेकर यांनी ‘शहा का रुतबा’ हे गाणे त्याला लावले होते. यामुळे ते पक्ष सोडणार अशी चर्चा सुरू झाली होती. पण अखेर आज या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.
लोकांना कळेल हू इज धंगेकर?
रवींद्र धंगेकर हे पुण्यातील लोकप्रिय लोकनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी त्यांची ओळख कामाने निर्माण केली आहे. यांच्या पोटनिवडणुकीवेळी मी तिकडे होतो. ती निवडणूक गाजली पण, सगळी फौज लागली तरी धंगेकरांनी बाजी मारली आणि लोकसेवक काय असतो हे दाखवले. आता तुम्ही शिवसेनेत आला आहात, त्यामुळे लोकांना कळेल हू इज धंगेकर? असे एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.
कोण आहेत रवींद्र धंगेकर?
रवींद्र धंगेकर हे मूळचे शिवसैनिक आहेत. 2002 ला ते पहिल्यांदा शिवसेनेकडून नगरसेवक झाले. राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर धंगेकरांनी मनसेमध्ये पक्षप्रवेश केला. 2007, 2012 ला ते मनसेच्या तिकीटावर नगरसेवक झाले. 2009, 2014 ला त्यांनी मनसेकडून विधानसभा लढवली होती. त्यावेळी गिरीश बापट यांनी त्यांचा पराभव केला होता. 2017 मध्ये रवींद्र धंगेकर यांनी राज ठाकरेंदेखील सोडचिठ्ठी देत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते काँग्रेसकडून नगरसेवक झाले.
म्हणून शिवसेना प्रवेशाचा निर्णय
पक्षप्रवेशापूर्वी रवींद्र धंगेकर म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी कामानिमित्त मागे दोन 3 वेळा भेटलो होतो. उदय सामंत यांची आणि माझीही भेट झाली. त्यांनी मला सांगितले की तुम्ही आमच्यासोबत काम करा. या बातम्यादेखील माध्यमांनी दाखवल्या. मी मतदारांशी चर्चा केली त्यांनी मला सांगितले की काम तर करावेच लागणार आहे, म्हणून मी शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. मी आमदार असताना एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते त्यांनी मला नेहमीच सहकार्य केले आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांचा चेहरा आहे त्यांच्यासोबत काम करावे अशी मी भूमिका घेतली आहे. एकनाथ शिंदे यांना मी विधान परिषद किंवा म्हाडाचे अध्यक्षपद मागितलेले नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App