विशेष प्रतिनिधी
बुलढाणा : Ravikant Tupkar महाविकास आघाडीने चर्चा करुन खेळवले आणि नंतर दगाफटका केला असा आराेप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडी सोबत जायचे नाही असा निर्णय घेतला आ हे. क्रांतिकारी शेतकरी संघटना महाविकास आघाडीसाेबत जाणार नसल्याचे रविकांत तूपकर यांनी सांगितले. Ravikant Tupkar
रविकांत तुपकर यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक बाेलावली हाेती. या बैठकीमध्ये सर्वानुमते महाविकास आघाडीसाेबत जायचे नाही असा निर्णय घेण्यात आला. 29 ऑक्टोबर रोजी हाेणाऱ्या महत्वाच्या बैठकीत निवडणूक लढवायची की नाही ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तूपकर म्हणाले, महाविकास आघाडीने शेतकऱ्यांचा अपमान केलाआहे,
कदाचित त्यांना शेतकऱ्यांच्या मतांची गरज नसावी . महाराष्ट्रात क्रांतिकारी शेतकरी संघटना ताकदीने उभी राहिल . या राज्यात काही ठिकाणी शेतकरी पुत्र अपक्ष लढणार आहे, त्यांचा प्रचार करणार आहे. अनेक चांगले लाेक आपल्याकडे पाठिंबा मागत आहेत. त्यांना पाठिंबा दिला जाइल. प्रत्येकच निवडणूक लढवायला पाहिजे असे नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App