विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज तिसर्या दिवशी देखील भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आरोपांची सरबत्ती केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने धमकावत किरीट सोमय्या आणि त्यांच्या त्यांनी टोळीने गेल्या काही वर्षांमध्ये तब्बल 7500 हजार कोटी रुपये गोळा केल्याचा सनसनाटी आरोप संजय राऊत यांनी केला आहे. Raut’s new allegation against Somaiya: Amit Shah, in the name of Fadnavis, collected 7500 threats !!
याचवेळी त्यांनी किरीट सोमय्यांवर “चोर”, “लफंगा” या शब्दांची आहे भडीमार केला आहे. शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत त्यांनी सोमा यांना “दलाल” – “भडवा” असे संबोधले होते, तर आज “चोर”, “लफंगा” या शब्दांचा आहेर त्यांना केला आहे.
चंद्रकांत दादा पाटील वगैरे भाजपच्या नेत्यांनी किरीट सोमय्याच्या नादी लागून या लफड्यात पडू नये अन्यथा लोक किरीट सोमय्याचे कपडे काढून मारणार आहेतच. तशीच गत भाजपच्या नेत्यांची होईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. मात्र त्याच वेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस असा काही घोटाळा करतील असे मला वाटत नाही, असे सांगून एकप्रकारे देवेंद्र फडणवीस यांना क्लीनचिट दिली असे दिसत आहे.
किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेत्यांवर एकापाठोपाठ एक आरोपांच्या तोफा धडाडत ठेवल्या असताना आणि ते पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल करीत असताना सोमय्या यांना भाजपपासून वेगळे काढून त्यांच्यावर आरोपांची सरबत्ती करण्याचे धोरण संजय राऊत यांनी आपल्याशी दिसून येत आहे. याच वेळी त्यांनी संजय राऊत यांनी आपल्याकडे किरीट सोमय्या च्या भ्रष्टाचाराचे ट्रकभर पुरावे आहेत असा दावाही केला आहे. किरीट सोमय्यांनी अमित शाह, फडणवीसांच्या नावे धमकावत गेल्या काही वर्षात 7500 हजार कोटी जमा केलेत, असा आरोप संजय राऊतांनी केली आहे.
फडणवीसांच्या नावाने किरीट सोमय्यांनी शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. पवई पेरूबाग जमीन प्रकरणी ४३३ बोगस लोकांना घुसवले, प्रत्येकी २५ लाख रुपये किरीट सोमय्यांच्या दलालांनी घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बोगस सह्या करत आणि त्यांच्या तसंच अमित शाह यांच्या नावाने किरीट सोमय्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कोटी रुपयांची वसुली झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. हा २०० ते ३०० कोटींचा घोटाळा असल्याचे ते म्हणाले. घोटाळ्याचे आपल्याकडे ट्रकभरुन पुरावे असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे.
किरीट सोमय्यांनी फक्त ईडीच्या नावे नव्हे तर फडणवीसांच्या नावेदेखील वसुली केली आहे. त्यांनी फडणवीसांना ५० कोटी देणार असल्याचे सांगितले होते, असा आरोप संजय राऊतांनी केला. मात्र आपल्या मागे काय चाललेय हे फडणवीसांनी माहिती नसावे. असे घोटाळे फडणवीस करतील असे मला वाटत नाही. पण त्यांच्या नावे हा घोटाळा करण्यात आला असून संबंधित सर्व कागदपत्रे मी तपास संस्थांना दिली आहेत. आता मुख्यमंत्र्यांनाही भेटून या सगळ्या प्रकाराची माहिती देणार आहे, असे संजय राऊतांनी सांगितले.
मी जुहूबद्दल सांगितलेल्या प्लॉटची माहिती समोर येईल. पवईतील अनेक लोक माझ्याकडे आले आहेत. किरीट सोमय्या आपल्याच चपलेने स्वत:लाच मारणार आहे. महाराष्ट्राचे लोक त्यांची कपडे काढून धिंड काढणार आहेत. चंद्रकांत पाटील वैगेरे भाजपाचे काही नेते मधे पडत आहेत. पण त्यांनी मधे पडू नये अन्यथा उघडे पडतील. उगाच या प्रकरणात पडू नका. लोक सोमय्यांची धिंड काढणारच आहेत. त्यात तुम्ही सहभागी झालात तर लोक तुमचेही कपडे काढतील, असा इशारा संजय राऊतांनी दिला.
महाराष्ट्रात लूट सुरु आहे आणि आम्हाला सांगत आहे. आता मी रोज भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार आहे. लोकं समोरुन येऊन माहिती देत असून किरीट सोमय्यांची एकूण २११ प्रकरणे समोर आली आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App