प्रतिनिधी
मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत आणि संजय पवार यांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार बाळासाहेब थोरात यांनी हजेरी लावून महाविकास आघाडीची एकजूट दाखवली. त्यानंतर आपले राजकीय मतांचे गणित जुळत नाही असे समजून संभाजी राजे छत्रपती आता राज्यसभा निवडणुकीतून अपक्ष उमेदवार म्हणून माघार घेण्याची तयारी चालवल्याची बातमी आहे. Raut – Thackeray, Pawar, Thorat present themselves to fill Pawar’s application
संजय राऊत आणि संजय पवार यांचे उमेदवारी अर्ज दाखल करताना महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावून हे तिन्ही पक्ष एकत्र असल्याचा राजकीय संदेश महाराष्ट्रात पोचवला आहे. अशा स्थितीत संभाजीराजे यांचे राज्यसभा निवडणुकीच्या मतांचे गणित अधिकृत पातळीवर तरी जमत नाही हे लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांनी आता अर्ज भरण्यापूर्वी आधार घेण्याची तयारी चालवण्याची बातमी संभाजीराजे यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिली आहे. मराठी माध्यमांनी या बातम्या याच सूत्राच्या आधारे चालवल्या आहेत. स्वतः संभाजी राजे उद्या पत्रकार परिषद घेऊन आपली अधिकृत भूमिका जाहीर करण्याची देखील शक्यता असल्याची बातमी आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेकडून खा. संजय राऊत, कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, रा. काँ.चे अध्यक्ष खा. शरद पवार साहेब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. pic.twitter.com/JHmBiGvlGr — ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) May 26, 2022
राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेकडून खा. संजय राऊत, कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, रा. काँ.चे अध्यक्ष खा. शरद पवार साहेब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. pic.twitter.com/JHmBiGvlGr
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) May 26, 2022
मात्र राज्यसभा निवडणुकीतील सहाव्या जागेच्या निमित्ताने जे राजकारण घडले त्याचा राजकीय सिक्वेन्स पाहता संभाजीराजे यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर करून नेमके काय मिळवले?? त्यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर करण्यामागे नेमके कोण होते?? हा प्रश्न तयार होतो आहे. स्वतः शरद पवारांनी राष्ट्रवादीची जादा मते देण्याचे आश्वासन संभाजीराजे यांना दिले होते. परंतु शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अथवा पुरस्कृत उमेदवार होण्याची त्यांची तयारी नसल्याने अखेरीस त्यांना माघार घेण्याखेरीज पर्याय उरला नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
– माघारीची तयारी आक्रमक
संभाजीराजे यांच्या समर्थकांनी तसेच स्वतः संभाजीराजे यांनी या माघारी ची तयारी देखील आक्रमक पद्धतीने केल्याचे दिसून आले. आता राज्यसभा नाही ही तर पूर्ण राज्य ताब्यात घेणार अशी पोस्टर्स संभाजीराजे यांच्या समर्थकांनी आधीच व्हायरल केली होती. संभाजीराजे यांनी आज सकाळीच ट्विट करून आपली वैचारिक बांधिलकी छत्रपती शिवाजी महाराजांशी आहे आणि आपण फक्त जनतेला बांधील राहू, असे जाहीर करून एक प्रकारे पक्षीय राजकारणापासून आपण दूर असल्याचे स्पष्ट केले होते.
त्याचबरोबर राज्यसभेचे गणित जुळले नाही तरी दीर्घकालीन राजकारणामध्ये आपला नक्कीच वाटा राहील असे देखील यातून संभाजीराजे यांनी सूतोवाच केल्याचे मानले जात आहे. उद्याच्या पत्रकार परिषदेत संभाजीराजे कोणत्या अधिकृत भूमिका जाहीर करतात?, याकडे देखील महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App