प्रतिनिधी
मुंबई : संजय राऊत यांचे थुंकी पुराण थांबायला तयार नाही. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या बद्दल प्रश्न विचारल्यानंतर संजय राऊत त्यांच्याच घरात थुंकले होते. त्यावर महाराष्ट्रात राजकीय महाभारत सुरू झाले. अजितदादांनी संजय राऊत यांना संयमाचा सल्ला दिला पण त्यावर आज संजय राऊत यांची जीभ आणखी घसरली. धरणात मुतण्यापेक्षा ठोकून चांगले अशा शब्दात त्यांनी अजित दादांना टोला हाणला. पण त्यावर देखील अजितदादांनी आता संयमीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.Raut speaking does not make holes in our body; Ajitdad’s restrained reply
संजय राऊत बोलल्याने आमच्या अंगाला काही भोकं पडत नाहीत. काय बोलायचे तो त्यांचा अधिकार आहे. ती मोठी माणसे आहेत आम्ही त्यांचा आदर करतो, अशा शब्दांमध्ये अजित दादांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आणि ते निघून गेले.
महाराष्ट्रात महापालिका निवडणूक केव्हा लावायचे हा सर्वस्वी निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. निवडणुका लावल्यानंतर महाविकास आघाडी आपल्या पद्धतीने चर्चा करून निर्णय घेईल. समोरचे सत्ताधारी त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतील. निवडणुका आल्या की त्या लढवल्या जातील, असेही अजित दादा म्हणाले
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App