प्रतिनिधी
नाशिक – नाशिक शहरातील अंबड पोलिस ठाण्यांतर्गत ब्युटी पार्लरमध्ये शिरून बलात्कार करणार्या आरोपीवर कठोर कारवाई करा, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करणार्या भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल करण्याचा “अद्भूत पराक्रम” नाशिकच्या पोलिसांनी केला आहे.rape in nashik beauty parlour, but police file cases against BJP MLA and corporaters
या प्रकरणातील आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे सोडून पीडितेसाठी न्याय मागणार्यांवरच पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये भाजप आमदार सीमा हिरे, पक्षाचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, नगरसेविका छाया देवांग, प्रतिभा पवार, अलका अहिरे, कावेरी घुगे, हर्षा फिरोदिया, नगरसेवक मुकेश शहाणे आणि अन्य कार्यकर्त्यांवर विविध कलमे लावून गुन्हे दाखल केले आहेत.
या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे – पवार सरकारवर टीकेची झोड उठविली असून न्याय मागण्यासाठी ठिय्या आंदोलन करणे हा काय गुन्हा आहे का… नाशिकमध्ये काय मोगलाई अवतरली आहे का, असे सवाल केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App