माणुसकी ! केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची अपघातग्रस्तांना तत्काळ मदत ; ताफ्यातील गाडीने रूग्णालयात केले दाखल

रावसाहेब दानवे यांनी दाखवली माणुसकी !


ताफ्यासमोरच जालना-बदनापूर रोडवर दुचाकीस्वाराचा अपघात झाला. त्यावेळी दानवे यांनी आपला ताफा थांबवला आणि अपघातग्रस्ताला रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था केली. Raosaheb Danve showed humanity!


विशेष प्रतिनिधी

जालना : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आपल्या बोलण्याच्या शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी मांडलेली भूमिका नेहमीच चर्चेचा विषय ठरते. अशा रावसाहेब दानवेंनी आपला ताफा थांबवत अपघातग्रस्तांना मदत केली. आपल्या नियोजित दौऱ्यावर जात असताना रावसाहेब दानवे यांच्या ताफ्यासमोरच जालना-बदनापूर रोडवर दुचाकीस्वाराचा अपघात झाला. त्यावेळी दानवे यांनी आपला ताफा थांबवला आणि अपघातग्रस्ताला रुग्णालयात पोहोचवण्याची आपल्या ताफ्यातील एक गाडी दिली . दानवेंचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे .

आपल्या मतदारसंघातील कोरोनामुळे मृत्यू जालेल्या कुटुंबाच्या सांत्वनपर भेटीसाठी रावसाहेब दानवे दौऱ्यावर होते. या दौऱ्यावर असताना जालना-बदनापूर रोडवर दानवे यांच्या ताफ्यासमोरच एका दुचारीस्वाराचा अपघात झाला. त्यावेळी दानवे यांनी आपला ताफा थांबवला. त्यांनी जखमींची विचारपूस केली आणि आपल्या ताफ्यातील एका पोलीस गाडीत जखमींना बसून जालना इथं उपचारासाठी पाठवलं. तसंच जखमींच्या नातेवाईकांनाही अपघाताची माहिती दिली. दानवेंच्या या कृतीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Raosaheb Danve showed humanity!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात