प्रतिनिधी
मुंबई : राणा दाम्पत्याने चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी कलम 153 (अ) अंतर्गत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पण यानंतर लगेच राणा दाम्पत्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यामुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि मंत्री अनिल परब यांच्याविरोधात राणा दाम्पत्याने तक्रार दाखल केली आहे.Rana couple lodges complaint against CM directly at Khar police station; Allegations of conspiracy to provoke
उद्धव ठाकरेंच्या विरोधात तक्रारी
शुक्रवारी संध्याकाळी मातोश्रीत मिटींग बोलावून शनिवारसाठी विशेष आराखडा तयार केला.
त्यानुसार शनिवारी शेकडोंचा जमाव मातोश्रीसमोर बोलावण्यात आला, त्यांच्याकडे बॅट, हत्यारसदृश वस्तू होत्या.
आम्हाला जीवे मारण्याचे वातावरण तयार केले. आम्हाला शारीरिक नुकसान होईल अशी परिस्थिती देखील तिथे निर्माण केली.
अॅम्ब्युलन्ससुद्धा तयार ठेवली. अॅम्ब्युलन्स राणा दाम्पत्यासाठी आहे अशा घोषणा देखील शिवसैनिकांनी दिल्या. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत चिथावणी दिली.
आम्ही केवळ हनुमान चालिसा म्हणणार होतो, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या इतर नेत्यांनी चिथावणी दिली.
आमच्या जीविताला काही धोका निर्माण झाला तर त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत आणि मंत्री अनिल परब जबाबदार राहतील.
या आरोपांखाली खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App