विशेष प्रतिनिधी
नागपूर : Ramdas Athawale आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील आता जागांची मागणी केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 10 ते 12 जागा द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. नागपूर येथे त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती, या प्रसंगी ते बोलत होते. Ramdas Athawale
रामदास आठवले म्हणाले, वंचित बहुजन आघाडीला राज्यात म्हणावे तेवढे यश मिळालेले नाही. आम्ही लोकसभेला 2 जागा मागितल्या होत्या, मात्र मिळाल्या नाहीत. आता विधानसभा निवडणुकीत आम्हाला 12 जागा द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्रात आम्ही 18 जागांची यादी केली आहे. त्यापैकी 12 जागा द्याव्यात तसेच विदर्भात किमान 4 जागा पाहिजे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. Ramdas Athawale
12 जागांची केली मागणी
पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले, माझ्या पक्षासोबत मोठ्या प्रमाणात दलित मतदार आहेत. आम्हाला भाजपच्या कोट्यातून मानू नये, तर भाजप, शिंदे आणि अजित पवारांच्या कोट्यातून 4-4 जागा द्याव्या, म्हणजे आम्हाला 12 जागा मिळतील. येणाऱ्या एनडीए सरकारमध्ये आम्हाला मंत्री पद द्यावे, तसेच 2 महामंडळ द्यावे, अशी मागणी आठवले यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चतुर नेते आहेत. ते आमची ताकद ओळखतील, असा विश्वासही त्यांनी दाखवला आहे. Ramdas Athawale
Pandit Dhirendra Shastri : तिरुपती लाडू वादावर बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक विचार करणे आवश्यक
रामदास आठवले म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांनी अनेक निवडणुका लढवूनही त्यांच्या जागा निवडून येत नाही. त्यामुळे मी एकदा म्हणालो की त्यांनी एनडीएमध्ये यावे, त्यांच्या जागाही निवडून येतील. त्यांना मंत्री करण्यासाठी मी प्रयत्न करेल. 1990 मध्ये प्रकाश आंबेडकर माझ्यासोबत राहिले असते, तर आमच्या किमान दहा-बारा जागा निवडून आल्या असत्या आणि उपमुख्यमंत्री पद आम्हाला मिळाले असते. प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. त्यांनी समजून घेतले पाहिजे ते एकटे लढून सत्तेत येऊ शकत नाहीत, त्यांनी आघाडी करणे आवश्यक असल्याचा सल्ला आठवले यांनी दिला आहे. Ramdas Athawale
प्रकाश आंबेडकर यांना दिली सोबत येण्याची ऑफर
रामदास आठवले म्हणाले, रिपब्लिकन पक्षाचे एकत्रीकरण एखाद्या गटाने करून होणार नाही. त्यासाठी सर्व पक्षांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रकाश आंबेडकर यांना सोबत आणणे आवश्यक आहे. यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय झालेले एकत्रीकरण समाजाला मान्य झाले नाही. प्रकाश आंबेडकर सोबत आले तर त्या एकत्रीकरणासाठी मी तयार आहे. मला पद नसले तरी चालेल आणि प्रकाश आंबेडकर यांना अध्यक्ष केले तरी चालेल, असे आठवले यावेळी म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App