सराईत गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेसाठी दीडशे बाईक्ससह दोनशे जणांची रॅली बिबवेवाडी परिसरात निघाली होती. पोलीसांनी सुरूवातीला बघ्याची भूमिका घेतली होती. मात्र, याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर २०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Rally of 200 people with 150 bikes at the funeral of a criminal
विशेष प्रतिनिधी
पुणे : सराईत गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेसाठी दीडशे बाईक्ससह दोनशे जणांची रॅली बिबवेवाडी परिसरात निघाली होती. पोलीसांनी सुरूवातीला बघ्याची भूमिका घेतली होती. मात्र, याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर २०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीमुळे सामान्य माणसाला अंत्यसंस्काराला केवळ २० जणांची परवानगी आहे. मात्र, गुन्हेगाराचे हे सगळे उदात्तीकरण पोलीस पाहत होते. .पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री माधव वाघाटे या सराईत गुन्हेगाराचा दगडाने ठेचून निर्घुण खून करण्यात आला होता.
पोलिसांनी या प्रकरणी आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करीत काही आरोपींना अटक केली आहे. वाघाटेच्या अंत्ययात्रेत आता कोरोना नियमांना पायदळी तुडवली असल्याचे समोर आले आहे.
या अंतयात्रेचा एक व्हिडीओ समोर आला असून मोठ्या संख्येने या तडीपार गुंडाचे समर्थक अंत्ययात्रेत जमा झाले होते. अनेक जण मास्क न लावताच सहभागी झाले होते. पुण्यात सध्या चौकाचौकात नागरिक विनाकारण बाहेर पडत असल्यास त्यांच्यावर कारवाई आहे.
तर दुसरीकडे अशी घटना घडल्याचे हद्दीतील पोलिसांना कसे समजत नाही हाच सवाल उपस्थित होत आहे. काल दुपारी १ वाजल्याच्या सुमारास हा प्रकार घडल्यावर अखेर रात्री ८ वाजता भारती विद्यापीठ पोलिसांनी २०० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App