Rakesh Jhunjhunwala:शेअर बाजारातील ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचे वयाच्या 62व्या वर्षी निधन


वृत्तसंस्था

मुंबई : राकेश झुनझुनवाला यांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले. रविवारी 14 ऑगस्ट रोजी सकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच सर्वांनाच धक्का बसला. राकेश झुनझुनवाला यांना शेअर बाजाराचा बिग बुल म्हटले जायचे. इतकेच नाही तर झुनझुनवाला यांना भारताचे वॉरन बफेदेखील म्हटले जाते.Rakesh Jhunjhunwala death, Share market ‘Big Bull’ Rakesh Jhunjhunwala passed away at the age of 62



राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्यूच्या वृत्ताला ब्रीच कँडी हॉस्पिटलने दुजोरा दिल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांना 2-3 आठवड्यांपूर्वी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, आज सकाळी ६.४५ वाजता झुनझुनवाला यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Rakesh Jhunjhunwala death, Share market ‘Big Bull’ Rakesh Jhunjhunwala passed away at the age of 62

महत्वाच्या बातम्या

 

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात