प्रतिनिधी
पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोलापुरात केंद्रातल्या भाजप सरकारवर तोफा डागत असताना दुसरीकडे पंढरपुरात मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे शरद पवार यांच्यावर तोफा डागत असताना आढळले.Raju Shetty’s gun from Pandharpur while Pawar was in Solapur; Modi’s language is Pawar’s word
ऊसाच्या एफआरपीच्या मुद्द्यावर शरद पवार हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखीच भाषा वापरत आहेत, अशा स्थितीत शेतकऱ्यांनी कोणाच्या तोंडाकडे पाहायाचे?, असा खोचक सवाल राजू शेट्टी यांनी शेतकरी मेळाव्यात केला.
ऊसाच्या एफआरपी संदर्भात केंद्र सरकारने उत्तर प्रदेशला डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतल्याचा आरोप महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे नेते करतात, तर भाजपचे नेते या मुद्द्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे बोटे दाखवतात याकडे राजू शेट्टी यांनी लक्ष वेधले. मात्र शरद पवार यांच्या तोंडी जर मोदींचीच भाषा असेल तर त्याचे उत्तर पवारांना द्यावेच लागेल, असा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिला.
शरद पवार यांनी सोलापुरातून भाजपवर तोफ ङागताना लखीमपूर हिंसाचाराचा मुद्दा उचलून धरला. त्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्रात 11 तारखेला बंद पुकारला आहे. त्यामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन पवार यांनी केले.
शरद पवार हे सोलापुरातून भाजपवर टीकेची झोङ उठवत असतानाच शेजारच्या पंढरपूर मधूनच त्यांच्यावर राजू शेट्टी तोफा ङागताना आढळले त्यामुळे महाविकास आघाडीतला राजकीय अंतर्विरोध उघड्यावर आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App