विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या विधान परिषद आमदारकीचा चेंडू शरद पवारांनी हलकेच राज्यपालांच्या कोर्टात ढकलून दिल्यावर जागे झालेल्या राजू शेट्टींनी आता पवारांवर प्रहार केला आहे. Raju Shetti again targets sharad pawar on MLC seat and flood affected compensestion
आज राजू शेट्टी जलसमाधी आंदोलन करताहेत. त्याआधी पत्रकारांशी बोलताना त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीवर तोंडसुख घेतले. ते म्हणाले, माझ्या आमदारकीसंबंधी मला काहीच बोलायचे नाही. या बातम्या कोणी आणि कशासाठी पेरल्या याची मला माहिती आहे. पण ज्या तत्परतेने शरद पवार यांनी आमदारकीबाबत खुलासा केला तितक्याच तत्परतेने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बोलले असते तर अधिक आनंद झाला असता, असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला आहे.
राजू शेट्टी म्हणाले की शरद पवार महाविकास आघाडीचे प्रमुख आहेत. त्यांच्याच राज्य सरकारने पूरग्रस्तांना बेदखल केले आहे. शेतीचे पंचनामे करून दोन आठवडे उलटूनही अजून नुकसान भरपाईचा निर्णय नाही आणि पैसेही देण्यात आलेले नाहीत. त्यावर पवारांनी भाष्य करायला हवे होते. पण त्यांनी भाष्य केलेले नाही, असेही राजू शेट्टी यांनी लक्षात आणून दिले आहे.
शरद पवार म्हणाले होते की, राजू शेट्टी नाराज असतील त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने जी यादी तयार करून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिली आहे. त्यामध्ये राजू शेट्टी यांचे नाव आहे. राजू शेट्टींनी सहकाराच्या क्षेत्रात, शेतीच्या क्षेत्रात जे योगदान दिलं आहे. ते लक्षात घेऊन त्यांना विधानपरिषदेवर घ्यावे, असा प्रस्ताव राज्यपालांकडे आम्ही दिला आहे. त्याचा अंतिम निर्णय राज्यपालांकडून अद्याप आलेला नाही. त्यामुळे एकदा आम्ही हा निर्णय घेतल्यानंतर, त्या निर्णयाची अंतिम भूमिका ही राज्यपालांना घ्यायची असताना, मला आश्चर्य वाटते की अशा प्रकारची विधाने कशी केली जातात? पण आम्ही आमचे काम प्रामाणिकपणाने केले आहे. राजू शेट्टींना काय वक्तव्य करायचे असेल, तर मला त्यावर भाष्य करायचे नाही. पण मी दिलेला शब्द पाळला आहे. आता राज्यपाल काय करतात याची आम्ही वाट पाहतो आहोत.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App