हेमंत टकले आमदार आणि राजू शेट्टी पाण्यात ? आज नृसिंहवाडीत घेणार जलसमाधी


वृत्तसंस्था

मुंबई : विधान परिषदेच्या १२ आमदारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठवलेल्या यादीतून स्वाभिमानाचे नेते राजू शेट्टी यांचे नाव वगळून हेमंत टकले यांना संधी दिल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे टाकले आमदार होणार असून शेट्टी पाण्यात असल्याचे स्पष्ट होत आहे. कारण नावे काढ – घाल प्रकारण सुरु असताना शेट्टी हे पूरग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आज नृसिंहवाडी येथे जलसमाधी घेत आहेत. Hemant Takle MLA and Raju Shetty in the water? Jalasamadhi to be held at Nrusinhwadi today

पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पुरेशी मदत देण्यात यावी, या मागणीसाठी शेट्टी यांनी बुधवारपासून पंचगंगा परिक्रमा यात्रेला सुरुवात केल. ही यात्रा आज रविवारी नृसिंहवाडी येथे पोचल्यानंतर जलसमाधी आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. शेट्टी यांच्या या आंदोलनावरून प्रशासन सज्ज झाले आहे.



नृसिंहवाडी येथे जाणारे रस्ते रोखण्यात आले असून परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. तर शेट्टी यांना मार्गातच रोखण्याची नीती अवलंबण्यात येण्याची चिन्हे आहेत. असे झाले तर स्वाभिमानीचे कार्यकर्ते गनिमी कावा करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आमदार यादीत राजू शेट्टी यांचे नाव आहे. पण, राज्यपाल यांचा निर्णय अंतिम असल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसने विश्वामित्री पावित्रा नेहमी सारखा घेतला.

लाल कापड, आसूड आणि कडक लक्ष्मी

एखादा बैल जोरदार धावत येत असताना त्याची मुसंडी चुकवण्यासाठी एकदम लाल कापड काढून घेतले जाते , त्याप्रमाणे किंवा हातात आसूड घेऊन एखादी कडकलक्ष्मी थयथयाट करत चाबकाचे जोरदार फटके स्वतःला मारते. तेव्हा त्या असुडाच्या टोकाला ती गाठ बांधत नाही. कारण एकदा आसुडाला गाठ मारली की आसूड फार जोरात लागतो म्हणे, अशीच काहीशी कृती राष्ट्रवादीने राजू शेट्टी यांच्याबाबत केली आहे. ऐन जलसमाधी आंदोलनावेळी त्यांचे नाव आमदारांच्या यादीतून काढून टाकल्याचे वृत्त पसरले. नंतर तसे काही नाही.

आता राज्यपाल अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगून केलेल्या कृत्यावर पांघरूण घातले आहे. राष्ट्रवादीचा विश्वामित्री पवित्रा आहे. राज्यपाल आमदारांची नावे जाहीर करतील तेव्हा राष्ट्रवादीचे पितळ उघडे पडणार आहे. कारण नाव असेल तरच ते जाहीर होणार आहे. नाहीतर टकले आमदार बनणार हे निश्चितच आहे.

Hemant Takle MLA and Raju Shetty in the water? Jalasamadhi to be held at Nrusinhwadi today

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात