प्रतिनिधी
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया दीड तास चालली. खुब्यावरील ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्यांना ४ ते ५ दिवसांत घरी सोडण्यात येणार आहे. त्यांना घरीसुद्धा फिजिओथेरपी आणि उपचार करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांना पुढील २-३ महिने सक्तीचा आराम करावा लागणार आहे. या दरम्यान राज ठाकरे यांना कोणतीही सभा, भाषण किंवा मीटिंग घेता येणार नाही. Raj Thackeray’s surgery successful; Now is the time to relax; Discharge after 4 – 5 days
Raj Thackeray : स्थगित झालेला अयोध्या दौरा गाजविण्याचे कॉन्ट्रॅक्ट आणि सब कॉन्ट्रॅक्ट!!
– भाषणे, सभा बंद
राज ठाकरे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉ. जलील पारकर आणि डॉ. विनोद अग्रवाल यांनी यासंबंधी सविस्तर माहिती दिली. राज ठाकरे यांच्यावर आज दीड तास शस्त्रक्रिया चालली. ऑपरेशन दरम्यान त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. आता 4 ते 5 दिवस त्यांना रुग्णालयात उपचार करून मग त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. रुग्णालयात उद्यापासून त्यांना फिजिओथेरपी दिली जाईल. नंतर त्यांच्यावर घरीसुद्धा फिजिओथेरपी आणि उपचार करण्यात येईल. पुढचे दोन ते तीन महिने त्यांना आरामच करावा लागेल.
– सभा मीटिंग बंद
राज ठाकरे जोपर्यंत दोन्ही पायावर उभे राहू शकत नाहीत तोपर्यंत त्यांना कुठलीही सभा, भाषण किंवा मीटिंग घेता येणार नाही. आता त्यांना पुढचे काही दिवस सपोर्ट घेऊनच चालावे लागेल. दोन तीन महिन्यानंतर ते चांगले होतील. सर्वात महत्वाचा म्हणजे राज ठाकरे यांच्या चाहत्यांनी काळजी करण्याची गरज नाही. शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच्या चाचण्या करण्यासाठी राज ठाकरे यांना शनिवारी, १८ जून मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. अखेर आज त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मध्यंतरीच्या काळात टेनिस खेळताना राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. हीच दुखापत पुन्हा एकदा बळावली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App