पुण्यात भरदिवसा तरुणीवर कोयत्याने हल्ल्याच्या थरारक घटनेवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

Raj-Thackeray-10

घटनास्थळी उपस्थित लोकांनी घेतलेल्या बघ्याच्या भूमिकेवरही बोलले आहेत.

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  पुणे शहरातील कायम गजबजलेल्या आणि नावाजलेल्या सदाशिव पेठ भागात काल एक भयानक घटना घडली. भरदिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून एका तरुणींवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. दरम्यान या  घटनेनंतर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. Raj Thackerays reaction to the thrilling incident of a young woman being attacked by a coyote in Pune

सुदैवाने हल्लेखोर तरुणाला लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी वेळीच पकडले, अन्यथा त्या तरुणीचा जीवही जाऊ शकला असता. मात्र एवढ्या गजबजलेल्या ठिकाणी ती तरुणी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी पळत असताना, अन्य कोणीही त्या हल्लेखोर तरुणाला अडवण्याचा प्रयत्न का केला नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे म्हणतात, ‘’काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात ह्याचं आश्चर्य वाटतं. अर्थात पुढे कशाला चौकशीचा ससेमिरा असा विचार लोकांच्या मनात येत असेलही कदाचित पण ह्यासाठी पोलिसांनी लोकांना आश्वस्त करायला हवं.’’

याचबरोबर ‘’दर्शना पवारच्या हत्येची दुर्दैवी घटना नुकतीच घडलेली असताना, तसाच काहीसा प्रकार परत घडणं हे गंभीर आहे. सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत, त्यामुळे प्रशासनाकडून कायद्याचा धाक निर्माण होईल हे देखील बघायला सरकारची हरकत नसावी. आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगायला नको की असे प्रकार तुमच्या आसपास घडत नाहीत ना ह्याकडे डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा.’’ असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

Raj Thackerays reaction to the thrilling incident of a young woman being attacked by a coyote in Pune

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात