देशाला विचार देणारा, दिशा देणारा आपला महाराष्ट्र होता, पण तो आज कुठल्या खालच्या थराला येऊन थांबला आहे? असा सवालही केला आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raj Thackerays दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची निवड करण्यासाठी, देशभरातून आलेली अनेक बोधचिन्ह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आली होती. त्यातील राजमुद्रा आणि लेखणीचा अंतर्भाव असलेले बोधचिन्ह राज ठाकरेंना आवडलं आणि ते निवडावं असं त्यांन सुचवलं. साहित्य संमेलन समितीने देखील ते स्वीकारलं. त्यानंतर पुण्यात साहित्य परिषदेच्या कार्यालयात या बोधचिन्हाचे अनावरण झाले, या अनावरणाच्या प्रसंगी राज ठाकरेंनी ( Raj Thackerays ) मनोगत मांडलं, त्यातील काही महत्वाचे मुद्दे.Raj Thackerays
१) महाराष्ट्राची साहित्याची परंपरा उज्वल आहे, साहित्य संमेलन भरवणारे देखील महाराष्ट्र हे एकमेव राज्य असावं. खरंतर अशा कार्यक्रमात काय किंवा साहित्य संमेलनात काय राजकारण्यांना बोलवायची गरज नाही. साहित्यिकांनी बोलावं आणि राजकारण्यांनी ऐकावं असंच असलं पाहिजे.
२) सध्या महाराष्ट्राची एकूणच परिस्थिती प्रचंड खालावली आहे, राजकारण्यांची भाषा तर प्रचंड खालच्या पातळीवर गेली आहे, अशा राजकारण्यांना साहित्यिकांनी चांगलच ठणकावलं पाहिजे.
३) महाराष्ट्रात सध्या वाट्टेल ते सुरु आहे. नेते जाळ्यांवर उड्या काय मारत आहेत, खरंतर महाराष्ट्रात असे अनेक राजकारणी आहेत ज्यांना जाळ्या नसलेल्या इमारतीवरून उड्या मारायला लावल्या पाहिजेत.
४) देशाला विचार देणारा, दिशा देणारा आपला महाराष्ट्र होता, पण तो आज कुठल्या खालच्या थराला येऊन थांबला आहे? रोज सकाळी उठून वाट्टेल ते बोलणारे, वाट्टेल त्या भाषेत बोलणारे, राजकीय नेते दिसत आहेत. आणि महाराष्ट्राच्या या अधःपतनाला दूरचित्रवाणीच्या वाहिन्या पण तितक्याच जबाबदार आहेत. आपण काहीही बोललो तरी ते दाखवलं जातं हे माहित असल्यामुळे हे नेते वाट्टेल ते बोलत सुटलेत. आज जी मुलं लहान आहेत, ज्यांना राजकारणात यायचं आहे अशा मुलांना वाटत राहणार, असं अद्वातद्वा, अर्वाच्य बोलणं म्हणजेच राजकारण. म्हणूनच साहित्यिकांनी राजकारण्यांचे कान धरले पाहिजेत आणि साहित्यिकांनी आपण ट्रोल होऊ याची भिती अजिबात बाळगू नये. तुम्ही बोललंच पाहिजे. साहित्य संमेलनं होतील, पुस्तकं येतील, आम्ही ती वाचत राहू, पण अशा प्रकारची साहित्यिक चळवळ उभी करावी लागेल की, ज्यातून राजकारणातील घसरणारी भाषा ही सुधारली पाहिजे.
५) साहित्यिकांनी राजकारण्यांना सांगायचं की, त्यांनी काय करावं आणि राजकारण्यांनी ते ऐकावं अशीच परिस्थिती असली पाहिजे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App