Maharashtra Bhushan Award : ‘’या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का?’’ – राज ठाकरेंचा सवाल!

‘’सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली, तरी…’’ असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : पद्मश्री, ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र सरकारच्यावतीने काल सर्वात मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला. नवी मुंबईच्या खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर महाराष्ट्र भूषण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी जवळपास २० लाखांपेक्षा अधिक अनुयायांनी हजेरी लावली होती. मात्र या सोहळ्याला आता गालबोट लागल्याचं बोललं जात आहे. कारण, उन्हातान्हात तासंतास बसून राहिल्याने सोहळ्यासाठी आलेल्या अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला, एवढंच नाही तर यामुळे ११ श्री सदस्यांना जीवही गमावावा लागल्याचे समोर आले आहे. Raj Thackeray targets the state government due to the death of citizens attending the Maharashtra Bhushan award ceremony

या घटेनेमुळे आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील यावर प्रतिक्रिया देताना, सरकारचे कान टोचले आहेत.

मनसे अध्यक्षत्र राज ठाकरे म्हणाले, ‘’काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेंव्हा घोषित झाला तेंव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का? कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का?’’

याशिवाय ‘’सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली, तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे.’’ असंही राज ठाकरे यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

रविवारी झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघातामुळे ११ जणांचा मृत्यू झाला. २४ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ८ महिलांचा समावेश असून यातील बहुतांश वृद्ध आहेत. नवी मुंबईतील खारघर येथील मोठ्या मैदानात सकाळी साडेअकरा ते दुपारी १ वाजेपर्यंत हा कार्यक्रम पार पडला. यादरम्यान दिवसाचे कमाल तापमान ३८ अंश होते.  या कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा यांनी समाजसेवक दत्तात्रेय नारायण उपाख्य अप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार प्रदान केला. या कार्यक्रमाला त्यांचे लाखो अनुयायी उपस्थित होते. सर्व लोकांना कार्यक्रम पाहता यावा आणि ऐकता यावे यासाठी मैदानात ऑडिओ व व्हिडीओची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती, परंतु लोकांना बसण्यासाठी केलेल्या व्यवस्थेवर कोणतीही सावली ठेवण्यात नव्हती. उष्णतेमुळे अनेकांचे आरोग्य बिघडले.

मृतांच्या कुटुंबीयांना 5-5 लाख रुपयांची भरपाई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उष्णतेच्या लाटेमुळे रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांना भेटण्यासाठी गेले. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, या घटनेत 7-8 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 50 जणांना उष्माघातामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी 24 जणांवर उपचार सुरू असून, उर्वरितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगून मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली.

या सर्व लोकांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार असल्याचे ट्विट फडणवीस यांनी केले आहे. त्यांनी लिहिले की, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात सहभागी झालेल्या काही सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला हे अतिशय दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.

Raj Thackeray targets the state government due to the death of citizens attending the Maharashtra Bhushan award ceremony

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात