या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेत्यांना आमंत्रित करण्यात आलेलं नाही. त्याबद्दलही शेलारांनी नाराजी व्यक्त केली आहे.Raj Thackeray should also be invited to Prabodhankar’s book publishing program, Ashish Shelaran’s direct letter to CM
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आसजपचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. ‘प्रबोधनमधील प्रबोधनकार’या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी राज ठाकरेंना आमंत्रित करायला हवं होतं, असं मत शेलारांनी पत्रातून व्यक्त केलं आहे.
या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेत्यांना आमंत्रित करण्यात आलेलं नाही. त्याबद्दलही शेलारांनी नाराजी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाला प्रथेप्रमाण विरोधी पक्षनेत्यांना आमंत्रित केलं असतं, तर अधिक आनंद झाला असता अस देखील आशिष शेलार पत्रात म्हणाले.
ज्या ज्या वेळी राज ठाकरे यांना भेटतो, त्या त्या वेळी त्यांच्या तोंडून प्रबोधनकारांचे ज्याज्वल्य विचार ऐकायला मिळतात. अद्यापही या कार्यक्रमाच निमंत्रण त्यांना देता येईल. या व्यासपीठावर राज ठाकरे आले तर एक संस्मरणीय सोहळा महाराष्ट्राला पाहता येईल, असं शेलारांनी पत्रात म्हटलं आहे.
दि.16 आक्टोबरला शासनातर्फे होणाऱ्या "प्रबोधनमधील प्रबोधनकार" या ग्रंथ प्रकाशनाच्या कार्यक्रमात प्रबोधनकारांच्या कुटुंबातील सदस्यांचा राजशिष्टाचार नुसार सन्मान करण्याबाबतची नम्र विनंती मा.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना पत्राव्दारे केली! @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/8JMDd1Xbqe — ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR ) (@ShelarAshish) October 15, 2021
दि.16 आक्टोबरला शासनातर्फे होणाऱ्या "प्रबोधनमधील प्रबोधनकार" या ग्रंथ प्रकाशनाच्या कार्यक्रमात प्रबोधनकारांच्या कुटुंबातील सदस्यांचा राजशिष्टाचार नुसार सन्मान करण्याबाबतची नम्र विनंती मा.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना पत्राव्दारे केली! @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/8JMDd1Xbqe
— ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR ) (@ShelarAshish) October 15, 2021
प्रबोधनमधील प्रबोधनकार या ग्रंथ प्रकाशनावरून नाराजीनाट्य रंगण्याची सुरूवात झाली आहे. विरोधीपक्ष नेत्याला निमंत्रण नाही ते ठिकय पण किमान प्रबोधनकारांच्या विचारांचा वारसा आणि व्यासंग असणाऱ्या राज ठाकरे यांना बोलवायला हवं, असं आशिष शेलार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App