प्रतिनिधी
मुंबई : एकीकडे राज ठाकरे यांचे भाषण करमणुकी पेक्षा फारसे महत्त्वाचे नाही, असे तर सांगायचे पण दुसरीकडे त्यांच्या भाषणातल्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करायचा अशी अवस्था राष्ट्रवादीच्या नेत्यांची झाली आहे. Raj Thackeray – NCP: Reactions of Ajitdada, Supriya Sule, Jayant Patil showing neglect of Raj Thackeray !!
राज ठाकरे यांची यांचे भाषण फक्त करमणूक होती. त्यांनी गंभीर मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले असे टीकास्त्र सुप्रिया सुळे यांनी सोडले आहे, तर राज ठाकरे यांना व्याकरणाचा क्लास लावला पाहिजे, अशी खोचक प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील राज ठाकरे यांच्या भाषणाकडे दुर्लक्ष करण्यासारखेच आहे. योग्य वेळी त्यांचे उत्तर देऊ, असे म्हटले आहे.
राज ठाकरे यांच्या पक्षाचे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही लोकप्रतिनिधी निवडून येत नाहीत. त्यांच्यावर काय बोलायचे?, अशी खोचक प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या भाषणावर व्यक्त केली होती. मात्र त्यावेळी देखील राष्ट्रवादीचे डझनभर नेते राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया द्यायला बाहेर पडले होते. ठाण्यातल्या उत्तर सभेनंतर देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाकडे दुर्लक्ष केल्याचे दाखवत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
राज ठाकरे यांचे भाषण ऐकले नाही. वर्तमानपत्रातून काही मुद्दे वाचले. त्यांचा वैयक्तिक टीकेवर भर होता. देशाच्या गंभीर मुद्द्यांकडे त्यांचे लक्ष नव्हते. ते इतिहासात जास्त रमले. भावी पिढीला ते काय देणार?,हे त्यांनी सांगितले नाही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
राज ठाकरे यांनी जयंत पाटील यांचा उल्लेख “जंत पाटील” असा केला होता. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांना व्याकरणाचा क्लास लावायचा सल्ला दिला. काही लोकांना मराठी भाषेतले आकार-उकार कळत नाहीत. त्यांना व्याकरणाचा क्लास लावला पाहिजे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी अजित पवार ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये मध्ये पोहोचले. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी राज ठाकरे यांच्या भाषणाविषयी विचारले. ही वेळ या भाषणावर प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे नाही, असे सांगून योग्य वेळी उत्तर देऊ, असे अजित पवार म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App