वृत्तसंस्था
सोलापूर : कर्नाटकातील इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांच्यासह २९ जणांना जुगार प्रकरणात अटक झाली आहे.त्यामुळे सोलापुरात खळबळ उडाली आहे. Raid on former MLA’s gambling den in Solapur; Sensation of arrest of 29 people
सोलापुरातील होटगी रोडवरील क्लब ९ येथे जुगार सुरू होता. गुन्हे शाखेने हॉटेलवर छापा टाकला. स्वतः रविकांत पाटील हा जुगार अड्डा चालवत असल्याचा आरोप पोलिसांचा आहे. त्यावेळी रविकांत पाटील हे स्वतः हॉटेलच्या बाहेर कार्यकर्त्यासह बसलेले होते. पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
हॉटेलमध्ये तपासणी केली तेव्हा १९जण हे जुगार खेळताना आढळले. त्यांच्याकडून रोख २ लाख २४ हजार ५४० रुपये, ४ लाख १९ हजारांचे मोबाईल, १३ हजारांचे जुगार साहित्य असे एकूण ६ लाख ५७हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रात्री उशीरा आरोपींची जामिनावर मुक्तता केली. रविकांत पाटील यांना अटक झाल्याचे कळताच कर्नाटकातील त्यांच्या समर्थकांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App