राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेतून अरुणाचल प्रदेश वगळला; काँग्रेसच्या चीनविषयक भूमिकेवर संशय गडद!!

नाशिक : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी आपल्या पूर्व – पश्चिम भारत न्याय यात्रेतून अत्यंत चलाखीने अरुणाचल प्रदेशला वगळले आहे, परंतु त्यामुळेच काँग्रेसच्या चीनविषयक भूमिकेवर गडद संशय निर्माण झाला आहे!!Rahul Gandhi ommites arunachal pradesh from his east west bharat maya yartra, raising serious questions over its political position on China!!

भारताच्या लडाखमधील गलवान मध्ये चीनने घुसखोरी केली होती. त्यावेळी शूर भारतीय सैनिकांनी ही घुसखोरी हाणून पाडून चीनला जबरदस्त धडा शिकवला होता, पण तरीदेखील राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी चिनी घुसखोरीवर भारतीय संसदेत आणि संसदेबाहेर मोठे अकांडतांडव केले होते. मोदी सरकार चीन पुढे लोटांगण घालत आहे, असा आरोप केला होता.



या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी आपल्या पूर्व – पश्चिम भारत न्याय यात्रेतून अरुणाचल प्रदेशला चलाखीने वगळून ही यात्रा “मणिपूर ते मुंबई” अशी जाहीर केली. सुरुवातीला ही यात्रा अरुणाचल प्रदेशातील “पासी घाट ते पोरबंदर” अशी निघणार होती. त्या यात्रेचा रूट काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी जाहीर केला होता. परंतु नंतर त्यांनीच भारत न्याय यात्रेचा रूप बदलून “मणिपूर ते मुंबई” असा असेल असे सांगितले. परंतु त्यामुळेच काँग्रेसच्या चीनविषयक एकूण भूमिकेविषयी गडद संशय निर्माण झाला आहे.

मूळात चीन अरुणाचल प्रदेशला आपल्या फाईव्ह फिंगर्स पैकी एक मानत स्वतःचाच प्रदेश मानतो. भारताने अरुणाचल प्रदेश वर अतिक्रमण केल्याचा कांगावा आंतरराष्ट्रीय पातळीवर करत राहतो. परंतु अरुणाचल प्रदेश भारताच्या अखंड आणि एकात्मतेचा अविभाज्य भाग आहे ही वस्तुस्थिती मोदी सरकार आणि त्याच्या आधीच्या सरकारांनी अनेकदा जाहीर केली आहे. यात पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारचाही समावेश आहे.

पण कोणत्याही भारतीय पंतप्रधानांच्या अरुणाचल दौऱ्याला चीन नेहमी आक्षेप घेतो. त्या प्रत्येक वेळी अरुणाचल प्रदेश वर चीनचे सार्वभौमत्व लादतो. चीनमध्ये भरलेल्या कोणत्याही क्रीडास्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या अरुणाचल प्रदेशातील स्पर्धकांना तो स्टेपल्ड व्हिसा देतो किंवा व्हिसा नाकारतो. यातून चीन वारंवार अरुणाचल प्रदेश आपलाच भाग असल्याचे वारंवार अधोरेखित करत राहतो.

काँग्रेस प्रणित UPA यूपीए सरकारचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग जेव्हा अरुणाचल प्रदेशच्या दौरा करू इच्छित होते, त्यावेळी चीनने आक्षेप नोंदवला होता. त्यावेळी सरकार बचावात्मक पवित्र्यात आले होते. परंतु, असाच आक्षेप चीनने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अरुणाचल दौऱ्यावर घेतला, त्यावेळी मोदी सरकारने तो आक्षेप धुडकावला आणि पंतप्रधान मोदींनी अरुणाचल प्रदेशला भेट दिली होती. इतकेच नाही, तर त्यानंतर अनेक केंद्रीय मंत्री अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर गेल्याची अनेक उदाहरणे आहेत.

अर्थात, त्याआधी इंदिरा गांधी, पी. व्ही. नरसिंह राव या काँग्रेसच्या दोन्ही पंतप्रधानांनी अरुणाचलचे दौरे केले होते, ही देखील वस्तुस्थिती आहे.

*परंतु 2008 मध्ये सोनिया गांधी पक्षाध्यक्ष असताना काँग्रेसच्या चीनविषयक धोरणात अचानक बदल झाला आणि INC अर्थात
काँग्रेस पक्षाने चिनी कम्युनिस्ट पार्टी अर्थात CCCP बरोबर एक सामंजस्य करार (MoU)
केला. त्यामध्ये कदाचित चीनच्या अरुणाचल प्रदेशावरील दाव्याला काँग्रेसने मान्यता दिल्याचे दाट संशय आहे. ही गोष्ट काँग्रेस अथवा त्या वेळच्या UPA सरकारने बिलकुलच जाहीर केले नव्हती आणि आजही काँग्रेसने ते जाहीर केलेले नाही. परंतु 2008 मध्ये सोनिया गांधी आणि शी जिनपिंग यांच्याच उपस्थितीत बीजिंगमध्ये काँग्रेस अर्थात INC आणि चिनी कम्युनिस्ट पार्टी अर्थात CCCP यांच्यात सामंजस्य करार झाला होता, ही मात्र वस्तूस्थिती आहे. अर्थातच संशयाचे बीज या सामंजस्य करारात आहे.*

म्हणून तर राहुल गांधींनी आपल्या पूर्व – पश्चिम भारत न्याय यात्रेतून अरुणाचल प्रदेशाला वगळले नाही ना??, हा संशय गडद होतो आहे.

Rahul Gandhi ommites arunachal pradesh from his east west bharat maya yartra, raising serious questions over its political position on China!!

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात