प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला जोरदार सुरुवात झाली आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आदी महत्त्वाचे नेते संबोधित करणार आहेत. Rahul Gandhi is missing from the teaser and poster of Vajramooth meeting
पण या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर आहेत. अर्थात त्यांची तब्येत बरी नसल्याचे कारण यासाठी सांगण्यात येत आहे. अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे वरिष्ठ नेते वजन मोठ सभेत काँग्रेसचे प्रतिनिधित्व करत आहेत.
छत्रपती संभाजीनगरात आज राजकीय कलगीतुरा, मविआची वज्रमूठ सभा, तर भाजपची सावरकर गौरव यात्रा; अवघ्या 1 किमी अंतरावर दोन्हींचे आयोजन
राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी चा अपमान केल्याच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. एकूण 11 सभांपैकी ही महाविकास आघाडीची ही पहिली वज्रमूठ सभा आहे. या सभेच्या टीजर मधून आधी राहुल गांधी दिसले नाहीत. त्यानंतर पोस्टरवरही त्यांचा फोटो छापण्यात आला नाही.
त्यामुळे आधीच राहुल गांधींना उद्धव ठाकरे यांनी दिलेली राजकीय चपराक जोरदार बसली का?, याची चर्चा सुरू आहे. त्यानंतर आता नाना पटोले हे तब्येत बरी नसल्याच्या कारणामुळे सभेला अनुपस्थित आहेत यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App